सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याच्या प्रयत्नाचा आमदार अमित गोरखे यांचे कडून निषेध – “ही न्यायव्यवस्थेवर व लोकशाहीवर थेट आघाताची घटना”

PCC NEWS
2 Min Read
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"square_fit":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

“सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याच्या प्रयत्नाचा आमदार अमित गोरखे यांचे कडून निषेध – “ही न्यायव्यवस्थेवर व लोकशाहीवर थेट आघाताची घटना”

पिंपरी चिंचवड दिनांक ७ ऑक्टोंबर २०२५

(अपडेट बाय युनूस खतीब)

सर्वोच्च न्यायालयात सोमवारी (६ ऑक्टोबर २०२५) भारताचे सरन्यायाधीश मा. न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्यावर एका वकिलाने बूट फेकण्याचा केलेला प्रयत्न देशभरात संताप निर्माण करणारा ठरला आहे. वकील राकेश किशोर यांनी ‘सनातनचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत हे कृत्य केले. परंतु सतर्क सुरक्षा रक्षकांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

या घटनेचा तीव्र निषेध करत चिंचवडचे आमदार अमित गोरखे यांनी म्हटले की, “सरन्यायाधीशांवर झालेला हल्ला म्हणजे केवळ एका व्यक्तीवर नव्हे, तर देशाच्या संविधानावर, न्यायव्यवस्थेवर आणि लोकशाही मूल्यांवर थेट आघात आहे.”

गोरखे म्हणाले, “मा. न्यायमूर्ती भूषण गवई हे देशातील सर्वोच्च न्यायिक पदावर कार्यरत असलेले प्रामाणिक व निर्भीड न्यायाधीश आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला होणे म्हणजे न्यायसंस्थेवरील जनतेचा विश्वास डळमळीत करण्याचा प्रयत्न आहे.”

ते पुढे म्हणाले, “संविधानाने दिलेले स्वातंत्र्य हे मनमानी किंवा हिंसक वर्तनासाठी परवाना नाही. असहमती व्यक्त करण्याचे लोकशाही मार्ग आहेत, परंतु अवमानकारक वर्तन कधीही स्वीकारार्ह नाही.”

आमदार गोरखे यांनी या घटनेतील दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली असून, “न्यायसंस्था स्वतंत्र, निडर आणि संविधाननिष्ठ राहणे हीच खरी देशभक्ती आहे,” असे मत व्यक्त केले.

या घटनेनंतर सरन्यायाधीश गवई यांनी शांतपणे सुनावणी सुरू ठेवून दाखवलेला संयम आणि स्थैर्य हा न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेचा आदर्श ठरल्याचेही गोरखे म्हणाले.

TAGGED:
Share This Article
Leave a comment