माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, राष्ट्रवादीला मिळाले नवे बळ.

PCC NEWS

माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादीत प्रवेश, राष्ट्रवादीला मिळाले नवे बळ.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदियात राष्ट्रवादीला बळ, माजी मंत्री राजकुमार बडोले यांचा पक्षात प्रवेश.

महाराष्ट्र दिनांक : २२ ऑक्टोंबर २०२४ (पीसीसी न्यूज प्रतिनिधी )माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपक्षात प्रवेश केला आहे. राजकुमार बडोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. राजकुमार बडोले यांच्यासारख्या अनुभवी नेत्याचा पक्षात समावेश केल्यास पक्षाची स्थिती मजबूत होईल, असे अजित पवार म्हणाले.

अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे दोनवेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलेले राजकुमार बडोले यांचा गोंदिया भागात मोठा प्रभाव आहे. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे या महत्त्वाच्या भागात पक्षाची स्थिती मजबूत होणार आहे.

Share This Article
Leave a comment