महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस तर्फे  माजी सैनिकांचा  सन्मान करुन विजय दिन साजरा.

PCC NEWS

महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस तर्फे  माजी सैनिकांचा  सन्मान करुन विजय दिन साजरा.

Pccity news

१६ डिसेंबर १९७१ साली भारत-पाकिस्तान या युद्धात भारताच्या विजयास५२ वर्षे झाल्याबद्दल पुण्यातील  घोले रोड येथील पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करून महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस तर्फे  विजय दिन साजरा करण्यात आला.

Pccnews

भारताने या युद्धात पाकिस्तानला पराभूत करून त्याचे दोन तुकडे करून स्वतंत्र बांग्लादेश निर्माण केले आणि जगाला भारताची ताकत दाखवून दिली होती.

या कार्यक्रमास १९७१ साली झालेल्या युद्धात जिवाची बाजी लावून झुंज  देणारे  भारतीय सैन्य दलातील शूर योद्धा कॅप्टन बाबू पोलके हे
उपस्थित होते  त्यांनी  १९७१ साल या युद्धातील अनेक चित्तथरारक प्रसंग उपस्थितां समोर  मांडले.

या वेळी माजी सैनिक सेल चे प्रदेश अध्यक्ष दीपक राजे शिर्के, सुभेदार श्रीमंत राठोड, सुधीर शिंदे, तात्याराव मुंडे, आनंद जाधव, कॅप्टन अजित निंबाळकर यांचा सन्मान करण्यात आला.

Pccnews

१९७१ च्या लढाईमध्ये शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहून

महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस या संस्थेचे अध्यक्ष आदम  सय्यद  यांनी माहिती दिली की, १६ डिसेंबर विजय  दिन  या दिवसाने वीरत्व, समर्पण आणि देशभक्तीचे महत्त्व समजावे आणि तसेच या युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांचा सम्मान कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.

तसेच विविध क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या  मान्यवरांना प्राइड ऑफ महाराष्ट्र या  पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी राज्यमंत्री ज्ञानेश्वर कांबळे, ए सी पी, आर एन राजे, हे होते.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन संस्थेचे उपाध्यक्ष सतीश राठोड व सचिव स्नेहा कुलकर्णी यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे कार्याध्यक्ष महेबूब सय्यद यांनी केले.

सामूहिक राष्ट्रगीताने या देश भक्तिमय वातावरणात या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

TAGGED:
Share This Article
Leave a comment