पूरग्रस्तांच्या मदतीला राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अन्नधान्य, कपडे, साड्यांचे वाटप
“ही मदत नव्हे, आपले कर्तव्य”
पिंपरी चिंचवड दिनांक:१२ ऑक्टोंबर २०२५ (pccnews .in) सोलापूर जिल्ह्यासह मराठवाडा परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, गुरे-ढोरे वाहून गेली, तर हातातोंडाला आलेली शेती पाण्यात गेली. या संकटग्रस्त बळीराजाच्या मदतीसाठी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट स्वतः पुढे सरसावल्या.
मोहोळ तालुक्यातील मुंढेवाडी आणि अर्जुनसोंड या दोन गावांमध्ये त्यांनी स्वतः जाऊन अन्नधान्य, साड्या, ऊबदार कपडे, टॉवेल, बिस्कीट यांसारख्या आवश्यक वस्तूंचे वाटप केले. “आम्ही तुमच्या सोबत आहोत” असा शाब्दिक आधार देत त्यांनी पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण निर्माण केला.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा वर्षा शिंदे, स्थानिक महिला पदाधिकारी तसेच प्रा. आल्हाट यांचे कुटुंबीय उपस्थित होते. “पूरग्रस्तांना मदत करणे हे आमचं सामाजिक कर्तव्य आहे. संकटाच्या काळात एकमेकांना हात देणं ही आपली संस्कृती आहे. प्रत्येकाने आपल्या परीने या कार्यात सहभागी व्हावं,” असे आवाहन प्रा. कविता आल्हाट यांनी केले.
पूरग्रस्तांच्या मदतीला राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अन्नधान्य, कपडे, साड्यांचे वाटप “ही मदत नव्हे, आपले कर्तव्य”पिंपरी चिंचवड दिनांक:१२ ऑक्टोंबर २०२५ (pccnews .in) सोलापूर जिल्ह्यासह मराठवाडा परिसरात झालेल्या अवकाळी पावसाने आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, गुरे-ढोरे वाहून गेली, तर हातातोंडाला आलेली शेती पाण्यात गेली. या संकटग्रस्त बळीराजाच्या मदतीसाठी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा प्रा. कविता आल्हाट स्वतः पुढे सरसावल्या.मोहोळ तालुक्यातील मुंढेवाडी आणि अर्जुनसोंड या दोन गावांमध्ये त्यांनी स्वतः जाऊन अन्नधान्य, साड्या, ऊबदार कपडे, टॉवेल, बिस्कीट यांसारख्या आवश्यक वस्तूंचे वाटप केले. “आम्ही तुमच्या सोबत आहोत” असा शाब्दिक आधार देत त्यांनी पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण निर्माण केला.या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा वर्षा शिंदे, स्थानिक महिला पदाधिकारी तसेच प्रा. आल्हाट यांचे कुटुंबीय उपस्थित होते. “पूरग्रस्तांना मदत करणे हे आमचं सामाजिक कर्तव्य आहे. संकटाच्या काळात एकमेकांना हात देणं ही आपली संस्कृती आहे. प्रत्येकाने आपल्या परीने या कार्यात सहभागी व्हावं,” असे आवाहन प्रा. कविता आल्हाट यांनी केले.