चिंचवड विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार रवींद्र पारधे यांचे ट्रँपेट प्रचार जोरात मतदार संघात जोरदार प्रतिसाद.
पिंपरी चिंचवड दिनांक : 18 नोव्हेंबर 2024 (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) चिंचवड मतदार संघात बहुजन बांधव ,मुस्लिम बांधव ,भटके विमुक्त बांधव यांचे प्रश्न आजपर्यंत प्रलंबित असून यावर आवाज कोणीही उचलेला नाही ,मतदार संघातील विकास हवा तसा झालेला नाही चिंचवड मतदार संघातील झोपडपट्याना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे ,झोपडपट्टी मधील रस्ते,पाणी,वीज ,आरोग्य यांचा प्रश्न वाढत आहे आज पर्यंत निवडून आलेल्या प्रतिनिधी यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे बहुजन मुस्लिम समाजाला दुर्लक्षित केलेले जाणवत आहे यामुळे चिंचवड मतदार संघात जनतेला बदल हवा असून एक प्रामाणिक बहुजन विचारांचा उमेदवार रवींद्र पारधे सर हे न्याय देतील असा विश्वास जनमानसात रुजत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांशी माझी नाळ जोडलेली आहे. समाजासाठी मी गेली अनेक वर्षे काम करीत आहे.
चिंचवड मतदारसंघातील अनेक समस्या प्रलंबित आहेत. समाजसेवक या नात्याने अनेक समस्यांविषयी जन आंदोलने तसेच मोर्चेच्या सहाय्याने समस्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु हे सर्व प्रश्न व समस्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभागृहातच मांडल्यानंतरच सुटू शकतात हे माझ्या लक्षात आले.
आज सर्व समाजातील सामाजिक ऐक्य व बंधुभाव यांचे धोक्यात येण्याचे कारण म्हणजे सार्वजनिक शिक्षण व्यवस्था बंद होण्याच्या मार्गाकडे जाऊन खाजगी शैक्षिणीक संस्थाचा प्रभाव वाढत आहे. त्यात आर्थिक दुर्बल घटक व बहुजन समाज मोफत मिळणाऱ्या शिक्षणापासून वंचित राहत आहे. यामध्ये शासनाच्या उदासिनतेमुळे शैक्षणिक संकुलाच्या ठिकाणी कार्यालये उघडली जातात. त्यामुळे सर्वसामान्य तसेच आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकातील मुलांच्या शिक्षणाच्या दर्जाची अधोगतीकडे वाटचाल सुरू आहे. शहरामध्ये झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे राहणीमान व जीवनमान उंचविण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन करणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच वाढती लोकसंख्या पाहता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता हक्काचे घर मिळण्याकरिता घरकुल योजना राबविण्याचे गरजेचे आहे.
पावसाळ्यात नदीपात्रालगत परिसरातील नागरिकांचे पुरासारख्या समस्यांमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याने त्याकरिता आवश्यक ते नियोजन करण्याची नितांत गरज आहे; परंतु त्याची कोणीही आवश्यक ती दखल घेताना दिसत नाही. सार्वजनिक सरकारी-निमसरकारी प्रकल्प बंद करून त्याचे खाजगीकरण अतिशय वेगाने सुरू आहे.
आज सर्वांगीण सामाजिक विकास घडवून आणावयाचा असेल तर पुरोगामी विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याची गरज आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षि छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीराव फुले, स्त्री शिक्षणाच्या आद्यजननी सावित्रीबाई फुले, महामाता रमाई आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, वस्ताद लहुजी साळवे, मुक्ता साळवे, भारतातील पहिल्या मुख्याध्यापीका फातिमा बीबी, ताराबाई शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, संत तुकाराम महाराज, संत कबीर, संत रोहिदास, संत नामदेव, संत गाडगेबाबा, संत ज्ञानेश्वर महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नारायण मेघाजी लोखंडे, यांच्या पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र पुनर्जिवित करण्यासाठी मी कोणत्याही पक्षाशी बांधिल न राहता सर्वांगीण विकास करण्याचा मनोदय हाती घेऊन मी आपणापुढे विनम्र आवाहन करीत आहे
तरी सर्व मतदार माता-पिता, बंधू-भगिनी, युवक-युवतींना माझी नम्म्र विनंती की, मला प्रचंड बहुमतांनी विजयी करून आपला विकास व सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, ही विनंती.
१. उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरात स्वतंत्र कामगार आयुक्तालय उभारणेसाठी प्रयत्न करणार.
२. चिंचवड शहरात भव्य असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे व क्रांतिसूर्य महात्मा फुले स्मारक व भवन उभारणार. तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सोयीकरिता अद्यावत मोठे स्पर्धा परीक्षा केंद्र, अभ्यासिका केंद्र उभारणार,
३. पिंपरी-चिंचवड शहराची उद्योगनगरी बरोबरच माहिती व तंत्रज्ञान व क्रीडानगरी म्हणून ओळख देश पातळीवर घेऊन जाणार.
४. मतदार संघातील सर्व झोपडपट्ट्यांचे एस.आर.ए (S.R.A.) अंतर्गत पुनर्वसन करून झोपडपट्टीधारकांना हक्काची पक्की घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. तसेच ३०० चौ. फुटाऐवजी ५०० चौ. फुट क्षेत्राची घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार.
५. चिंचवड मतदारसंघातील मुस्लिम बांधवांसाठी दफनभूमीसाठी जागा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करणार. तसेच उर्दू शाळांची संख्या वाढवून दर्जावाढ व शिक्षक भरती होण्यासाठी प्रयत्न करणार.
६. चिंचवड मतदारसंघातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी प्रयत्न करणार. चिंचवड मतदार संघ टैंकर मुक्त करणार.
७. पिंपरी-चिंचवड वकिलांच्या लॉयरर्स चेंबरसाठी जागा उपलब्ध करुण बांधणे व अॅडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्टसाठी प्रयत्न करणार.
८. भक्ती-शक्ती निगडी ते देहूरोड व देहूरोड ते हिंजवडी मेट्रो मार्गाकरीता प्रयत्न करणार.
९. रिंग रेल्वेच्या जागेवर मेट्रो प्रकल्प राबविणेचा प्रयत्न करणार.
१०. चिंचवड मतदारसंघात अत्याधुनिक अतिरिक्त सबरजिस्ट्रार कार्यालय वाढवण्यासाठी प्रयत्न करणार.
११. चिंचवडशहरात विविध ठिकाणी सर्व रोगांवरील उपचाराकरिता मोफत अद्यावत रुग्णालय उभारण्याचा प्रयत्न.
१२. चिंचवड मतदारसंघातील जेष्ठ कलाकारांचे मानधन महिना रु.१५ हजार मिळवून देण्याचा प्रयत्न करणार.
१३ चिंचवड मतदारसंघातील महिलांच्या विकासासाठी महिला सक्षमीकरण योजना राबविणार, तसेच बचत गट निर्मिती करून महिलांना रोजगार व हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार.
१४. उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड शहरात आयटीच्या धर्तीवर तांत्रिक प्रशिक्षण केंद्र उभारणार.
१५. शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सांस्कृतिक भवन निर्मितीसाठी प्रयत्न करणार.
१६. चिंचवड मतदारसंघातील पवना, मुळा नदी प्रदूषण मुक्तीसाठी व नदी सुधार प्रकल्प राबविणार
१७. शहरातील वाढत्या वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार. तसेच पार्किंग समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार.
१८. उद्योगनगरीतील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याकरिता मेळाव्याचे आयोजन करून रोजगार मिळवून देणार.
१८. उद्योगनगरीतील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याकरिता मेळाव्याचे आयोजन करून रोजगार मिळवून देणार.