दिव्यांग क्रिकेटपटूंचा इम्तियाज खान व दिलीप पवार यांच्या हस्ते सत्कार

PCC NEWS
1 Min Read

दिव्यांग क्रिकेटपटूंचा इम्तियाज खान व दिलीप पवार यांच्या हस्ते सत्कार

अन्वर अन्सारी व साजिद तांबोळी यांची भारतीय संघात निवड

पिंपरी चिंचवड दिनांक : २७ शहरातील दोन होनहार दिव्यांग क्रिकेटपटूंनी राष्ट्रीय पातळीवर मोठी कामगिरी बजावत संपूर्ण शहराचा अभिमान वाढवला आहे. शहरातील अन्वर मुख्तार अन्सारी व साजिद करीम तांबोळी या दोघांची भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात खेळाडू म्हणून निवड झाली असून दिव्यांग क्रिकेट कंट्रोल बोर्ड ऑफ इंडिया तर्फे 19 नोव्हेंबर रोजी ही निवड अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रभाग क्रमांक 13 मधील जनसेवक इम्तियाज खान व उद्योजक दिलीप पवार यांनी या दोन्ही खेळाडूंचा शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान केला.

याप्रसंगी इम्तियाज खान म्हणाले, “अन्वर व साजिद हे दोघेही खेळाडू नक्कीच पिंपरी चिंचवड शहराचा नावलौकिक देशभरात व आंतरराष्ट्रीय पातळीवर करतील.”

तर उद्योजक दिलीप पवार यांनी शुभेच्छा देताना सांगितले, “या दोन्ही खेळाडूंच्यात प्रचंड क्षमता असून ते जागतिक स्तरावर पिंपरी चिंचवडचे नाव गौरवाने अधोरेखित करतील.”

दिव्यांग असूनही कठोर परिश्रम, निष्ठा आणि संघर्षातून या खेळाडूंनी साध्य केलेली ही यशस्वी कामगिरी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

https://youtube.com/shorts/Aw4GYf-slhM?si=tAB4q64dZaQPPVd6

Share This Article
Leave a comment