रुपीनगर उर्दू माध्यमिक विद्यालयात संविधान दिवस उत्साहात साजरा

PCC NEWS
2 Min Read

रुपीनगर उर्दू माध्यमिक विद्यालयात संविधान दिवस उत्साहात साजरा

विद्यार्थ्यांच्या सहभागातून लोकशाही मूल्यांना बळ

पिंपरी चिंचवड दिनांक : २६ (युनूस खतीब)उर्दू माध्यमिक विद्यालय, रुपीनगर येथे संविधान दिवस मोठ्या उत्साहात, शिस्तबद्ध वातावरणात आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री. आर. पी. कोंढावळे, सहायक शिक्षक श्री. अशफाक अफसर शेख, श्री. मोहम्मद आतिफ फैसल, श्रीमती ताहेरा फातिमा शेख यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी श्री. हाफिज जावेद हमजा यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व, मूल्ये आणि नागरिकांच्या कर्तव्यांची माहिती प्रभावीपणे दिली.

संविधान दिनानिमित्त शाळेत विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रश्नमंजुषा, पोस्टर सादरीकरण, चित्रकला, वक्तृत्व, निबंध, नाटक सादरीकरण, वृक्षरोपण तसेच संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन असे उपक्रम दिवसभर पार पडले. इयत्ता ९वीतील कु. मुनीबा सिद्दिकी हिने संविधानाची प्रस्तावना प्रभावी आवाजात सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले.

सकाळी ८ वाजता संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली. विद्यार्थी हातात फलक, घोषणा आणि संविधान मूल्यांचे संदेश घेऊन परिसरात जनजागृती करत फिरले.

संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन सहा. शिक्षक श्री. अशफाक अफसर शेख यांनी केले. या उपक्रमाचे आयोजन उर्दू माध्यमिक विद्यालय रुपीनगर विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकसन समितीच्या वतीने करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत संविधानातील लोकशाही, समानता आणि न्यायाच्या मूल्यांची प्रत्यक्ष अनुभूती घेतली. संविधान दिवसाचा कार्यक्रम यशस्वी, प्रेरणादायी आणि विद्यार्थ्यांसाठी बदल घडवणारा ठरला.

Share This Article
Leave a comment