बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त विविध आरोग्य उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

PCC NEWS
2 Min Read
Pccnews

बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिनानिमित्त विविध आरोग्य उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

249 रक्तदाते; 945 नागरिकांनी घेतला विविध आरोग्य सेवा उपक्रमांचा लाभ

दत्तवाडी–मोहननगर परिसरात भव्य आरोग्य शिबिरांचे आयोजन, मोठी नागरिकांची उपस्थिती

पिंपरी चिंचवड दिनांक:१७ नोव्हेंबर २०२५ (युनूस खतीब) हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त दत्तवाडी, मोहननगर, काळभोर नगर, चिंचवड स्टेशन व रामनगर परिसरात भव्य सामाजिक आणि आरोग्य उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिर, मोफत रक्त तपासणी, मोफत डोळे तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया निवड शिबिर, मोफत बॉडी फॅट मशीन चेकअप तसेच मोफत आयुर्वेदिक कांस्य मशीन मसाज यांचा नागरिकांनी मोठ्या उत्साहात लाभ घेतला.या उपक्रमांमध्ये 249 रक्तदात्यांनी रक्तदान, 180 नागरिकांनी डोळे तपासणी, 165 नागरिकांनी रक्त तपासणी, 295 नागरिकांनी बॉडी फॅट चेकअप तर 305 नागरिकांनी आयुर्वेदिक कांस्य मशीन मसाज करून घेतला. एकूण 900 पेक्षा अधिक नागरिकांना या उपक्रमांचा लाभ मिळाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना संघटक महाराष्ट्र वसंत मोरे व माजी आमदार आणि जिल्हाप्रमुख गौतमजी चाबुकस्वार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शहरप्रमुख संजोग वाघेरे-पाटील, माजी नगरसेविका उर्मिला काळभोर, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, माजी नगरसेवक मारुतीराव भापकर, पुणे जिल्हा महिला संपर्कप्रमुख लतिकाताई पाष्टे, जिल्हा समन्वयक सुशीला पवार, शहर संघटिका रूपालीताई आल्हाट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

सामाजिक कार्यकर्ते विशाल यादव, दीपा महेश काटे, उपशहरप्रमुख अमोल निकम, सुदाम परब, विजय गुप्ता, अजय लड्डा, निलेश शिंदे, युवा नेते अजय काळभोर, डॉ. वैशाली कुलते, वैभवी घोडके, सुषमा शेलार, तस्मिन शेख, योगिनी मोहन, वैशाली काटकर, दीप्ती काळभोर, आयुष निंबाळकर, बाबासाहेब भोंडवे, सतीश मरळ, पंकज चोपदार आदींची उपस्थिती लक्षणीय होती.कार्यक्रमाचे संयोजन सोमनाथ दादा काळभोर, गोविंदराव शिंदे, ऋषिकेश घोरपडे, कृष्णा माने, किशोर शिंदे, ऋषिकेश कडव यांनी केले. संपूर्ण उपक्रमाचे आयोजन शिवसेना–युवासेना पिंपरी चिंचवड उपशहरप्रमुख निखिल दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

Share This Article
Leave a comment