प्रणव प्रकाश यादव यांची भारतीय जनता युवा मोर्चा शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती
पिंपरी–चिंचवड दिनांक : ३० (pccnews.in) भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी–चिंचवड शहराच्या संघटनात्मक बांधणीसाठी करण्यात आलेल्या नव्या नियुक्त्यांमध्ये प्रणव प्रकाश यादव यांची शहर उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. भाजयुमो शहराध्यक्ष मा. श्री. दिनेश लालचंद यादव आणि भाजपा पिंपरी–चिंचवड शहराध्यक्ष मा. श्री. शत्रुघ्न बापू काटे यांच्या हस्ते यादव यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी प्रदेश महामंत्री श्री. प्रमोद परदेशी, विधी आघाडीचे अॅड. विशाल डोंगरे तसेच अॅड. नवनाथ जगताप उपस्थित होते.
पक्षातील विविध सामाजिक उपक्रम, युवा संपर्क, जनसेवा आणि संघटनात्मक बांधणीमध्ये प्रणव यादव यांनी दाखविलेल्या सक्रिय कार्याचा गौरव करून ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना प्रणव यादव म्हणाले, “पक्ष नेतृत्वाने माझ्यावर दाखविलेला विश्वास ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. पिंपरी–चिंचवड शहरातील युवकांपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचवणे, संघटन वाढवणे आणि जनसेवा हेच माझे प्राधान्य असेल.”
प्रणव यादव यांच्या या नियुक्तीमुळे शहरातील भाजयुमोच्या कार्याला नवे बळ आणि दिशा मिळेल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
प्रणव यादव यांची शैक्षणिक व सामाजिक कामगिरी
प्रणव प्रकाश यादव हे बी.ई. (सिव्हिल) पदवीधर असून ते सामाजिक आश्रम सेवा संस्थेत सचिव म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये त्यांचे मोलाचे योगदान असून त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे करून उल्लेखनीय छाप निर्माण केली आहे.
प्रणव प्रकाश यादव हे बी.ई. (सिव्हिल) पदवीधर असून ते सामाजिक आश्रम सेवा संस्थेत सचिव म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्रातील विविध उपक्रमांमध्ये त्यांचे मोलाचे योगदान असून त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे करून उल्लेखनीय छाप निर्माण केली आहे.

