काळ्या काचेच्या क्रेझसाठी मोजले तब्बल चार कोटी.

PCC NEWS

काळ्या काचेच्या क्रेझसाठी मोजले तब्बल चार कोटी.

पिंपरी- चिंचवड वाहतूक पोलिसांची धडक कारवाई, पंधरा महिन्यांत ७१ हजार वाहनचालकांवर कारवाई
काळ्या काचा असलेल्या वाहनांवर पिंपरी- चिंचवड वाहतूक पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे. मागील पंधरा महिन्यात ७१ हजार ३१५ बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करून तब्बल ३ कोटी ९२ लाख १ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांच्या काळ्या काचा पिंपरी- चिंचवडकारांना चांगल्याच महागात पडल्याचे दिसून येत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने २९ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या कालावधीत कारला काळ्या काचा लावल्याने ३ हजार ४३५ वाहनचालकांवर कारवाई करीत ३८ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

आचारसंहिता कालावधीत विशेष मोहीम राबवून वाहनांची तपासणी केली जात आहे. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे अन् अतिरिक्त आयुक्त वसंत परदेशी हे स्वतः अचानक तपासणी नाक्यावर जाऊन कामकाजाची पाहणी करीत आहेत.

TAGGED:
Share This Article
Leave a comment