अभिमानास्पद भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात पिंपरी चिंचवड चा अन्वर मुख्तार अन्सारी अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड

PCC NEWS
2 Min Read

अभिमानास्पद
भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात पिंपरी चिंचवड चा अन्वर मुख्तार अन्सारी अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड

पिंपरी–चिंचवड, दि. 19 (युनूस खतीब) भारत सरकारच्या नीती आयोगावर नोंदणीकृत दिव्यांग क्रिकेट नियंत्रण मंडळ ऑफ इंडिया अंतर्गत खेळणाऱ्या भारतीय दिव्यांग क्रिकेट संघासाठी पिंपरी-चिंचवड येथील अन्वर मुख्तार अन्सारी यांची अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या निवडीचे पत्र संघाचे पदाधिकारी मुकेश कांचन यांनी 19 नोव्हेंबर रोजी अधिकृतरित्या जाहीर केले.

भारतीय संघाचा नेपाळविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना येत्या 13 डिसेंबर रोजी खेळवला जाणार असून, त्यानंतर 14 व 15 डिसेंबरला झारखंडमधील रांची येथे द्विपक्षीय मालिका आयोजित करण्यात आली आहे. या संपूर्ण मालिकेसाठी अन्सारी यांना संघात अष्टपैलू म्हणून स्थान देण्यात आले आहे.

राष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे अन्सारी यांच्या निवडीला अधोरेखित महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्या फलंदाजी-गोलंदाजीतील कामगिरीचा विचार करून निवड समितीने त्यांचे भारतीय दिव्यांग क्रिकेट संघात स्वागत केले.

निवड समितीने पाठवलेल्या पत्रानुसार, अन्वर अन्सारी यांनी 12 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेपूर्वी टीम कॅम्पमध्ये हजर राहणे आवश्यक आहे. तसेच 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर 2025 या कालावधीतील रजा संबंधित शाळा, महाविद्यालय किंवा कार्यालयास तात्काळ कळवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

दिव्यांग क्रिकेट नियंत्रण मंडळाने त्यांचे निवडीबद्दल अभिनंदन करत आगामी आंतरराष्ट्रीय मालिकेत उत्कृष्ट प्रदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली आहे. समाजातील अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी प्रतिक्रिया क्रीडाविश्वातून मिळत आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a comment