उमेदवारीच्या तर्क वितर्कला अजित पवार यांनी दिला पूर्णविराम.
पिंपरी चिंचवड दिनांक :२३ ऑक्टोंबर २०२४ (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) पिंपरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कोण असणार याबाबत बरेच तर्क वितर्क काढले जात होते पण आज सकाळी राष्ट्रवादी अजित पवार गटाने 38 विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची यादी जाहीर केली.
विद्यमान आमदार अण्णा बनसोडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघातून अण्णा बनसोडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात यावी अशी मागणी अनेक नगरसेवक यांच्याकडून अजित पवार यांच्याकडे करण्यात आली होती.
दरम्यानच्या काळात काही नगरसेवकांनी अण्णा बनसोडे यांना उमेदवारी देऊ नये असे जाहीर वक्तव्य केले होते.
मात्र पिंपरी विधानसभा मतदारसंघातून विजयी होण्याची शक्यता अण्णा बनसोडे यांची आहे यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून वरिष्ठ पातळीवरती चर्चा झाल्यानंतर अण्णा बनसोडे यांना उमेदवारी जाहीर केल्याचे आज सकाळी जाहीर करण्यात आले.