चिंचवड गावात भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न 

PCC NEWS
4 Min Read
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"square_fit":1,"effects":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

चिंचवड गावात भव्य रोजगार मेळावा उत्साहात संपन्न

शिवशाही व्यापारी संघ आणि लाईट हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने १५ पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग – युवा नेते सचिन दोनगहू यांचा रोजगार क्रांती उपक्रम

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) रोजगार निर्मितीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून चिंचवड गावात युवा नेते सचिन अरुण दोनगहू (कार्याध्यक्ष – शिवशाही व्यापारी संघ, पिंपरी चिंचवड शहर) आणि लाईट हाऊस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य मोफत रोजगार मेळावा प्रचंड उत्साहात पार पडला. या रोजगार मेळाव्यात TATA Group, BVG, KFC, D-Mart, Zudio, आदी १५ पेक्षा अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला.

शेकडो युवक-युवतींनी मेळाव्यात सहभाग घेतला. उमेदवारांना कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरशिवाय थेट कंपन्यांच्या Payroll वर रोजगार मिळाला. BFSI, टेलिकॉलिंग, मॅन्युफॅक्चरिंग, लॉजिस्टिक्स, रिटेल, हॉस्पिटॅलिटी, सिक्युरिटी, हाऊसकीपिंग आदी क्षेत्रांत नियुक्त्या करण्यात आल्या.

दीपप्रज्वलनाने मेळाव्याचा शुभारंभ

रोजगार मेळाव्याची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक नितीन गवळी, भाजप संघटन सरचिटणीस आणि नगरसेवक मोरेश्वर शेंडगे, शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष लोकसेवक युवराज धाकले, प्रदेशाध्यक्ष कृष्णाजी साबळे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष मनोज तोरडमल, शहराध्यक्ष शिवाजी खडसे, माथाडी कामगार प्रदेशाध्यक्ष गणेश कलवले, वाहतूक आघाडी शहराध्यक्ष अनिल तांबे, लोणावळा शहराध्यक्ष सावंत, ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे, उपाध्यक्ष अनिकेत साळवे, शिव सेना उप शहर प्रमुख राजेश भाऊ आरसूळ टायगर ग्रुप अध्यक्ष सिद्धार्थ भाऊ गायकवाड,सचिव राहुल सावंत,, अध्यक्ष पँथर युवा मोर्चा बाळासाहेब शिंदे, सामाजिक कार्यकर्ते निलेश भाऊ ओव्हाळ,युवा नेते किशोर भाऊ खंडागळे, सामाजिक कार्यकर्ते अरुण भाऊ लोंढे, विजय दादा डोंगरे, ओंकार गायकवाड, गौतम गायकवाड, अरुण अडागळे, बाबा शिंदे, अनंत गंगावणे, प्रदीप मिसाळ, नामदेव सचणे, रवी लोंढे, किशोर थोरात, अजय महाजन, , बाळासाहेब पाटोळे, कुणाल दोनगहू, गणेश धाबडगे, निलेश ओव्हाळ, सुधाकर सुतके,वळवळ फेम रील स्टार आनंद शिंदे, सुप्रसिद्ध रील स्टार शंभो महाजन, बाळासाहेब शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते अमोल देवकर उपस्थित होते.

भाजप संघटन सरचिटणीस पिंपरी चिंचवड शहर वैशालीताई खाड्ये, सामाजिक कार्यकर्ते दैवता गंगावणे,अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविका अंजना गायकवाड,अंजना गायकवाड, अलका धनवडे, सत्यभामा लष्करे, सायली कसबे, शारदा दोनगहू, अंगणवाडी सेविका माया कुलथे, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मी संधीमणी,अंगणवाडी सेविका रुपाली तेलंगी, अंगणवाडी सेविका रेखा गायकवाड,अंगणवाडी सेविका अंजना गायकवाड,अंगणवाडी सेविका,कलावती नाटेकर यांनीही या उपक्रमात सहभाग घेतला.

रोजगार देणे म्हणजे समाजाला सशक्त बनविण्याचा मार्ग. आज शेकडो युवकांना थेट नामांकित कंपन्यांमध्ये संधी मिळाली, हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. भविष्यातही रोजगार आणि उद्योगाभिमुख उपक्रम सातत्याने राबवले जातील.” – सचिन दोनगहू

रोजगार म्हणजे सन्मान. सचिन दोनगहू यांच्या पुढाकाराने समाजात आत्मनिर्भरतेचा नवा अध्याय सुरू झाला आहे.” – उद्योजक नितीन गवळी

हा रोजगार मेळावा समाजहिताचा आदर्श आहे. तरुणांना स्थैर्य देणारे हे काम खऱ्या अर्थाने लोकसेवा आहे.” मोरेश्वर शेंडगे

सचिन दोनगहू यांनी युवकांसाठी जे कार्य केले, ते प्रेरणादायी आहे. समाजातील प्रत्येक तरुणाला या उपक्रमातून प्रोत्साहन मिळाले.” – युवराज धाकले

संधी मिळाली की तरुण प्रगतीचे शिखर गाठतात. आजचा दिवस त्याचा पुरावा आहे.” – मनोज तोरडमल

महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग हा समाजातील बदलाचा संकेत आहे. रोजगार म्हणजे सक्षमीकरणाचं माध्यम.” – अंजना गायकवाड

शिवशाही व्यापारी संघ नेहमीच जनतेसाठी काम करत आला आहे. सचिन दोनगहू यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी झाली.” – शिवाजी खडसे

सचिन दोनगहू आणि त्यांच्या टीमने उत्तम नियोजन करून हा उपक्रम यशस्वी केला. समाजासाठी हे एक प्रेरणादायी उदाहरण आहे.” – सिद्धार्थ गायकवाड

रोजगार मेळाव्यात उमेदवारांसाठी नाश्ता व चहाची सोय करण्यात आली होती. शेकडो युवक-युवतींना ऑन-द-स्पॉट नोकरी मिळाली. शिवशाही व्यापारी संघ, लाईट हाऊस, आणि वेताळ बुवा प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने झालेल्या या मेळाव्याने पिंपरी चिंचवड परिसरातील रोजगार क्षेत्रात एक नवा इतिहास घडवला आहे.

स्थानिक नागरिक, पालक आणि उपस्थित उमेदवारांनी हा उपक्रम ऐतिहासिक ठरल्याचे मत व्यक्त केले. रोजगार मिळाल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलले – आणि चिंचवड शहरात आत्मनिर्भरतेचा नव्या पहाटेचा प्रारंभ झाला.

Share This Article
Leave a comment