प्रभाग क्रमांक १३ मधील मतदारांचे मनःपूर्वक आभार – इम्तियाज अफजल (इम्मूभाई) खान
Share
1 Min Read
पिंपरी चिंचवड सिटी न्यूजपिंपरी | युनूस खतीब
SHARE
प्रभाग क्रमांक १३ मधील मतदारांचे मनःपूर्वक आभार – इम्तियाज अफजल (इम्मूभाई) खान
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी प्रभाग क्रमांक १३ मधील सर्व सुज्ञ व जागरूक मतदारांनी संविधानाने दिलेल्या मतदानाच्या हक्काचा प्रभावी वापर करून लोकशाही बळकट करण्यासाठी तसेच प्रभागाच्या उज्ज्वल भवितव्य आणि विकासासाठी मोठ्या प्रमाणावर मतदान केल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज अफजल (इम्मूभाई) खान यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत.
या निवडणूक प्रक्रियेत प्रभाग क्रमांक १३ मधील मतदार बंधू-भगिनींनी दाखवलेला उत्स्फूर्त सहभाग हा लोकशाहीसाठी प्रेरणादायी असून, या लढ्यात आम्हाला दिलेल्या विश्वासाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल मी सदैव ऋणी राहीन, असे खान यांनी सांगितले.
तसेच निवडणूक प्रक्रिया शांततेत, पारदर्शक आणि यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतलेल्या सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस प्रशासन, पत्रकार बांधव तसेच कार्यकर्ते, समर्थक आणि स्वयंसेवक यांचेही त्यांनी विशेष आभार मानले.
निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सर्वांनी जिवाचे रान करून कर्तव्य बजावले, याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.