प्रभाग क्र. ९ मध्ये जनसागर; भव्य विजय संकल्प जाहीर सभा उत्साहात संपन्न

PCC NEWS
2 Min Read
पिंपरी चिंचवड सिटी न्यूजपिंपरी | युनूस खतीब

प्रभाग क्र. ९ मध्ये जनसागर; भव्य विजय संकल्प जाहीर सभा उत्साहात संपन्न

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक ९ च्या सर्वांगीण विकासाचा संकल्प घेऊन आयोजित करण्यात आलेली “भव्य विजय संकल्प जाहीर सभा” आज मतदार बंधू-भगिनी व नागरिकांच्या प्रचंड उपस्थितीत उत्साहात पार पडली. सभेला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि जनसागर पाहता प्रभागातील जनतेने परिवर्तनासाठी कौल दिल्याचे स्पष्ट झाले असून विजय निश्चित असल्याचा विश्वास उमेदवारांकडून व्यक्त करण्यात आला.

या सभेस मार्गदर्शन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर मा. श्री. हनुमंतराव (आण्णा) भीमराव भोसले तसेच महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष तथा पिंपरी विधानसभा आमदार मा. श्री. अण्णासाहेब बनसोडे उपस्थित होते. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे सभेला नवी ऊर्जा मिळाली.

उपस्थित सर्व मान्यवरांचे व नागरिकांचे उमेदवारांनी मनःपूर्वक आभार मानले.
प्रभाग ९ साठी विकासाचा ध्यास घेऊन मैदानात उतरलेले सक्षम पॅनेल सभेत सादर करण्यात आले.

घड्याळ या चिन्हासह निवडणूक लढवत असलेले उमेदवार श्री. सिध्दार्थ अण्णासाहेब बनसोडे (अ), सौ. डॉ. वैशालीताई घोडेकर (लोंढे) (ब), सौ. सारीकाताई विशाल मासुळकर (क) आणि श्री. राहुल हनुमंतराव भोसले (ड) यांना नागरिकांनी मोठा पाठिंबा दर्शविला.
ही सभा केवळ राजकीय कार्यक्रम नसून परिवर्तनाचा एल्गार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

नागरिकांनी दाखवलेले प्रेम आणि विश्वास हा प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महत्त्वाचा ठरेल, असे मत उमेदवारांनी व्यक्त केले.

येणाऱ्या निवडणुकीत ‘घड्याळ’ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रभागाच्या विकासासाठी प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Share This Article
Leave a comment