ओबीसी बांधवांनो हारलेली नाही, थांबलेली आहे; सत्ता आल्यानंतर पक्षश्रेष्ठी नक्की न्याय देतील – रोहिणीताई रासकर
Share
2 Min Read
Pccnewsपिंपरी | युनूस खतीब
SHARE
ओबीसी बांधवांनो हारलेली नाही, थांबलेली आहे; सत्ता आल्यानंतर पक्षश्रेष्ठी नक्की न्याय देतील – रोहिणीताई रासकर
पिंपरी (प्रतिनिधी) दि.८ जानेवारी २०२६:– पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची रणधुमाळी सध्या चालू असून प्रभाग क्रमांक १० मधून ओबीसी महिला राखीव पदासाठी भारतीय जनता पार्टी महिला ओबीसी शहराध्यक्षा रोहिणीताई रासकर इच्छुक होत्या. त्यांनी विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे व भाजपाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दिलेल्या आश्वासनाचा आदर राखत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जागी सुप्रियाताई चांदगुडे यांना उमेदवारी मिळाली आणि त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत. २० जानेवारी २०२६ ला भूमिका जाहीर करणारा असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे रोहिणी ताई रासकर यांनी दिली आहे.
प्रसिद्धी पत्रकात रासकर यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक दहा मधून निवडणूक न लढल्यामुळे शहरांमधूनच नव्हे तर राज्यांमधून ओबीसी बांधव विचारणा करत आहेत. शांत बसणाऱ्या मधली नाही हे सर्वांना माहीत आहे. शहरातील पक्ष श्रेष्ठी विधान परिषद आमदार अमित गोरखे,शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमाताई खापरे या सर्वांचा आदर करते.निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असताना शत्रुघ्न काटे यांनी आश्वासन दिले होते की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल. ओबीसी वर्गांसाठी लढत असतानाच ओबीसी साठी माघार घ्यावी लागली हे खरच दुःखद आहे. उमेदवारी मिळणार हे माहित होताच प्रभागातील नागरिक आनंदी झाले होते. अपक्ष उभी राहिले असते तरी विजय होण्याची ताकद माझ्या मागे उभी होती. कारण प्रभागामध्ये सर्व नागरिकांच्या सुख,दुःखामध्ये २४ तास सहभागी असते. माझ्या कामाच्या माध्यमातून मतदार राजाच्या मनावर राज्य केले आहे.
भारतीय जनता पार्टी हा तत्वनिष्ठ पक्ष आहे. यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली जाते. जो जनतेत जाऊन काम करतो त्याला पक्ष नक्कीच न्याय देतो. पक्ष सत्तेत आल्यानंतर प्रक्ष श्रेष्ठी नक्कीच मला चांगल्या पदावर संधी देऊन ओबीसींना न्याय देतील अशी अपेक्षा आहे. माझे काम प्रभागा पुरते मर्यादित नसून शहर व राज्यभर करत असल्यामुळे अनेक ओबीसी बांधव विचारणा करत आहेत. शहरातील पत्रकार बांधवही घडामोडी घडल्याची विचारणा करत असल्यामुळे त्यांच्या मागणीनुसार २० जानेवारी २०२६ रोजी पत्रकार परिषद घेऊन सर्व घटनाक्रम मांडणार आहे. महाराष्ट्रातील ओबीसी बांधवांना सांगेल की “तुमची ताई हारलेले नाही,थांबलेली आहे” असे मत रासकर यांनी व्यक्त केले आहे.