“सत्तेसाठी नव्हे, तर विश्वासासाठी निवडणूक” – विकासकामांच्या जोरावर जनतेसमोर पुन्हा एकदा जनप्रतिनिधी

PCC NEWS
1 Min Read
पिंपरी चिंचवड सिटी न्यूजपिंपरी | युनूस खतीब

“सत्तेसाठी नव्हे, तर विश्वासासाठी निवडणूक” – विकासकामांच्या जोरावर जनतेसमोर पुन्हा एकदा जनप्रतिनिधी

पिंपरी (प्रतिनिधी) : “ही निवडणूक आमच्यासाठी सत्तेसाठी नाही, तर जनतेने दिलेल्या विश्वासाची परीक्षा आहे,” असे ठाम मत व्यक्त करत संबंधित जनप्रतिनिधींनी पुन्हा एकदा जनतेसमोर उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. डोळ्यांत नवी स्वप्ने घेऊन नव्हे, तर गेल्या अनेक वर्षांत प्रभागात केलेल्या प्रत्येक कामाची आठवण आणि अनुभव घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलो आहोत, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.

प्रभागातील प्रत्येक गल्लीत, प्रत्येक घरात आणि प्रत्येक चेहऱ्यामागील वेदना आम्ही जवळून पाहिल्या आहेत. अडचणींच्या काळात केवळ आश्वासनांपुरते न थांबता, स्वतः पुढे येऊन समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला, असे सांगण्यात आले. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, सुरक्षेचे प्रश्न असोत वा अंधारामुळे निर्माण होणारी असुरक्षितता—प्रत्येक विषयावर नागरिकांसोबत खंबीरपणे उभे राहिल्याचा दावा त्यांनी केला.

“आमचं नातं मतापुरतं मर्यादित नाही, तर ते रोजच्या जगण्यातलं, सुख-दुःखातलं नातं आहे,” असे सांगत त्यांनी नागरिकांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्यावर भर दिला. केलेल्या विकासकामांच्या बळावर आणि त्याहूनही अधिक नागरिकांनी दिलेल्या प्रेम, विश्वास व पाठिंब्याच्या आधारावर पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळीही नागरिकांचा आशीर्वाद आणि पाठिंबा खंबीरपणे मिळेल, असा विश्वास व्यक्त करत “जनतेचा विश्वास हीच आमची खरी ताकद आहे,” असे भावनिक शब्दांत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Share This Article
Leave a comment