आकुर्डीत ‘ठाकरे शिवसेना चषक’ हाफ पीच क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; वाडी बॉईज दत्तवाडी संघ विजेता

Pccnews

PCC NEWS
2 Min Read
Pccnews

आकुर्डीत ‘ठाकरे शिवसेना चषक’ हाफ पीच क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; वाडी बॉईज दत्तवाडी संघ विजेता

पिंपरी चिंचवड दिनांक: 16 डिसेंबर 2025
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आयोजित ‘ठाकरे शिवसेना चषक’ भव्य हाफ पीच क्रिकेट टूर्नामेंट स्पर्धा २०२५ प्रभाग क्रमांक १४ मधील संत तुकाराम महाराज पालखी तळ, विठ्ठलवाडी, आकुर्डी येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत प्रभाग क्रमांक १४ मधील एकूण ३२ क्रिकेट संघांनी सहभाग घेतला होता. पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेत ३२ संघांमध्ये चुरशीचे सामने खेळविण्यात आले.

सोमवार, दिनांक १५ डिसेंबर रोजी सेमीफायनल व अंतिम सामने पार पडले. अंतिम निकालानुसार प्रथम क्रमांकाचे पारितोषिक वाडी बॉईज, दत्तवाडी आकुर्डी संघाने पटकावले. द्वितीय क्रमांक पोलीस लाईन, चिंचवड स्टेशन, तृतीय क्रमांक शादाब खान स्पोर्ट फाउंडेशन, काळभोर नगर तर चतुर्थ क्रमांक समीर खान स्पोर्ट फाउंडेशन, आकुर्डी संघाने मिळविला.

या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख व पिंपरी विधानसभेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार तसेच उपजिल्हाप्रमुख दस्तगीर मनियार यांनी उपस्थिती लावून खेळाडूंना शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले. बक्षीस वितरण सोहळा माजी नगरसेविका उर्मिला काळभोर, माजी नगरसेविका सविता वायकर, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, माजी नगरसेवक मारुती भापकर, माजी सामाजिक कार्यकर्ते संजय जगताप, शिवसेना नेते युवराज कोकाटे, सामाजिक कार्यकर्ते महेश काटे, अजित शितोळे, आयुष निंबाळकर, समीर बागवान, मनीषा शिंदे, पप्पू पठाण यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी निखिल दळवी यांच्याकडून प्रकाशित करण्यात आलेल्या कॅलेंडरचे प्रकाशन माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच बॉक्सिंग खेळाडू जयदीप रणनवरे, कराटे खेळाडू तृप्ती निंबळे व आदर्श शिंदे, तसेच युरो स्कूल आकुर्डीच्या प्रमुख मानसी ननावरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या स्पर्धेचे आयोजन निखिल उमाकांत दळवी यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय पवार व किशोर शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन शिवसेना आकुर्डी शाखाप्रमुख गोविंदराव शिंदे यांच्यासह उद्योजक सोमनाथ काळभोर, दीप्ती काळभोर, शिवराज रणनवरे, शादाब खान, प्रतीक जानराव, कृष्णा माने, ऋषिकेश घोरपडे, ऋषिकेश कडव, मयूर पवार, राजेश चौधरी, अण्णा शिंदे, यदनेश वाघमारे, शुभम फुले यांनी केले.

या स्पर्धेमुळे स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ मिळाले असून युवकांमध्ये क्रीडा संस्कृतीला चालना मिळाल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

Share This Article
Leave a comment