उर्दू माध्यमिक विद्यालय, रूपीनगर येथे बाल हक्क दिनानिमित्त जनजागृती उपक्रम उत्साहात
उर्दू माध्यमिक विद्यालय, रूपीनगर येथे बाल हक्क दिनानिमित्त जनजागृती उपक्रम उत्साहात

पिंपरी चिंचवड दिनांक: २१ नोव्हेंबर २०२५ (प्रतिनिधी) रूपीनगर उर्दू माध्यमिक विद्यालय रूपीनगर येथे आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिवसाचे औचित्य साधत २० नोव्हेंबर २०२५ रोजी विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या विशेष कार्यक्रमासाठी Hope for the Children Foundation चे प्रतिनिधी तसेच पिंपरी चिंचवड पोलिस विभागातील अधिकारी मान्यवर उपस्थित राहिले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता झाली. फाउंडेशनचे अँड. परम आनंद यांनी विद्यार्थ्यांना बाल हक्क, मुलांचे मूलभूत अधिकार आणि त्यांचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. तसेच पिं. चिं. पोलीस अधिकारी वैशाली खेडकर आणि प्रथमा पाटील यांनी “गुड टच-बॅड टच” या संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण विषयावर विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली. यावेळी पिं. चिं. पोलीस आयुक्तालयातील श्रीमती अश्विनी शिंदे व श्री. भूषण लोहारे यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले.
Leave a comment
Leave a comment

