PCC NEWS
1 Min Read

‘भारत केसरी’ पैलवानाच्या पत्नीची पोलिस ठाण्यात धाव – गुन्हा दाखल

चिंचवडगावात विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

चिंचवड, दि. १४ : चिंचवड पोलीस ठाण्यात विवाहितेच्या तक्रारीवरून पतीसह पाच जणांविरुद्ध मानसिक व शारीरिक छळप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपाली विजय गावडे (वय ३७, रा. चिंचवडगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिपाली गावडे यांना २० मे २०१४ पासून ते १४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सासरच्या लोकांकडून सातत्याने मानसिक त्रास, शिवीगाळ, टोमणे तसेच शारीरिक मारहाण करण्यात आली. पती विजय हनुमंत गावडे याने हाताने मारहाण करून शिवीगाळ केली, तर सासू, सासरे, ननंद व चुलत ननंद यांनीही विविध वेळा त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

याप्रकरणी आरोपी विजय गावडे, कमल गावडे, हनुमंत गावडे, वैशाली बेलदारे व किरण कोकाटे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१(२) तसेच भा.दं.वि. कलम ४९८(अ), ३२३, ५०४, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अजित दुधे करत आहेत. परिस्थिती सध्या स्थिर असून पुढील तपास सुरू असल्याचे चिंचवड पोलीसांनी सांगितले.

TAGGED:
Share This Article
Leave a comment