महिला पोलीस अंमलदाराला फोनवर अश्लील भाषेत शिवीगाळ ‘महाराष्ट्र विकास मिडिया’तील महेश कामत व काशीराम विचारे यांच्यावर गुन्हा दाखल

PCC NEWS
2 Min Read
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"square_fit":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

महिला पोलीस अंमलदाराला फोनवर अश्लील भाषेत शिवीगाळ ‘महाराष्ट्र विकास मिडिया’तील महेश कामत व काशीराम विचारे यांच्यावर गुन्हा दाखल

पुणे दिनांक ०८ नोव्हेंबर २०२५ (युनूस खतीब ९४२०५५४०६५) कोथरुड पोलीस ठाण्याचा अपमान करण्याच्या आणि महिला पोलीस अमलदाराचा विनयभंग करण्याच्या प्रकरणी ‘महाराष्ट्र विकास मिडीया’ मधील महेश कामत व त्याचा साथीदार काशीराम विचारे या दोघांविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी महिला पोलीस अमलदार धनश्री पांडुरंग कुलकर्णी (ब. नं. १६८२) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता कोथरुड पोलीस ठाण्याच्या अधिकृत क्रमांकावर महेश कामत या इसमाने फोन करून महिला अमलदारांशी अर्वाच्य भाषेत संवाद साधला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इतर पोलीसांविषयी अश्लील व बदनामीकारक वक्तव्य करत त्याने पोलीस यंत्रणेचा अपमान केला.

फिर्यादीच्या मते, आरोपीने या संभाषणातील काही भागांचे ऑडिओ क्लिप तयार करून इन्स्टाग्राम आयडी @maharashtravikasmedia वर ‘रील’ स्वरूपात प्रसारित केले. या रीलमधून जनतेमध्ये पोलीसांविरुद्ध अप्रितीची भावना चेतवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कृत्याला काशीराम बाबू विचारे (रा. कैलासनगर, अंबरनाथ) याने चिथावणी दिल्याचेही तपासात समोर आले आहे.

या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३०४/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ४९, ७८, ७९, २९६, ३५१(४), ३५२, ३५६(२) आणि पोलीस (अप्रीतीची भावना चेतवणे) अधिनियम कलम ३(५) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दोन्ही आरोपींची अद्याप अटक झालेली नसून, तपास पोलीस उपनिरीक्षक करिश्मा शेख या करत आहेत. प्राथमिक चौकशीत आरोपी महेश कामत याचा बदलापूर पोलीस ठाण्यात यापूर्वीही खंडणी व धमकीसारख्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

Contents
महिला पोलीस अंमलदाराला फोनवर अश्लील भाषेत शिवीगाळ ‘महाराष्ट्र विकास मिडिया’तील महेश कामत व काशीराम विचारे यांच्यावर गुन्हा दाखलपुणे दिनांक ०८ नोव्हेंबर २०२५ (युनूस खतीब ९४२०५५४०६५) कोथरुड पोलीस ठाण्याचा अपमान करण्याच्या आणि महिला पोलीस अमलदाराचा विनयभंग करण्याच्या प्रकरणी ‘महाराष्ट्र विकास मिडीया’ मधील महेश कामत व त्याचा साथीदार काशीराम विचारे या दोघांविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी महिला पोलीस अमलदार धनश्री पांडुरंग कुलकर्णी (ब. नं. १६८२) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता कोथरुड पोलीस ठाण्याच्या अधिकृत क्रमांकावर महेश कामत या इसमाने फोन करून महिला अमलदारांशी अर्वाच्य भाषेत संवाद साधला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक व इतर पोलीसांविषयी अश्लील व बदनामीकारक वक्तव्य करत त्याने पोलीस यंत्रणेचा अपमान केला.फिर्यादीच्या मते, आरोपीने या संभाषणातील काही भागांचे ऑडिओ क्लिप तयार करून इन्स्टाग्राम आयडी @maharashtravikasmedia वर ‘रील’ स्वरूपात प्रसारित केले. या रीलमधून जनतेमध्ये पोलीसांविरुद्ध अप्रितीची भावना चेतवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कृत्याला काशीराम बाबू विचारे (रा. कैलासनगर, अंबरनाथ) याने चिथावणी दिल्याचेही तपासात समोर आले आहे.या प्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३०४/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ४९, ७८, ७९, २९६, ३५१(४), ३५२, ३५६(२) आणि पोलीस (अप्रीतीची भावना चेतवणे) अधिनियम कलम ३(५) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.दोन्ही आरोपींची अद्याप अटक झालेली नसून, तपास पोलीस उपनिरीक्षक करिश्मा शेख या करत आहेत. प्राथमिक चौकशीत आरोपी महेश कामत याचा बदलापूर पोलीस ठाण्यात यापूर्वीही खंडणी व धमकीसारख्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
TAGGED:
Share This Article
Leave a comment