सोनई सभेत मातंग समाजावर जातिवाचक वक्तव्य करणाऱ्यांविरोधात पिंपरीत निवेदन पिंपरी चिंचवड मातंग समाजाची तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी

PCC NEWS
2 Min Read
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"square_fit":1,"effects":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

सोनई सभेत मातंग समाजावर जातिवाचक वक्तव्य करणाऱ्यांविरोधात पिंपरीत निवेदन,

पिंपरी चिंचवड मातंग समाजाची तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी

पिंपरी चिंचवड दिनांक ०२ : अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथे आयोजित सभेमध्ये मातंग समाजाविरोधात जातिवाचक, आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्ये करून जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि समाजाचा सन्मान राखण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील मातंग समाजाच्या वतीने पिंपरी पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.

या निवेदनात संबंधित वक्त्यांविरोधात अनुसूचित जाती-जनजाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि महाराष्ट्र जन सुरक्षा कायद्या अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

या प्रसंगी मातंग समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. त्यात मा. अविनाश शिंदे (संस्थापक अध्यक्ष – क्रांतिवीर विचार मंच महाराष्ट्र राज्य), मा. सचिन दोनगहु (कार्याध्यक्ष – पिं. चिं. शहर शिवशाही व्यापारी संघ महाराष्ट्र राज्य), मा. बाबासाहेब पाटोळे, मा. शंकर खवळे, मा. नाथा शिंदे, मा. आनंद कांबळे, मा. अविनाश गायकवाड, श्रीमती वैशाली जाधव यांच्यासह क्रांतिवीर विचार मंच, आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे विचार प्रबोधन पर्व, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विचार प्रबोधन पर्व, मातंग चेतना परिषद यांसारख्या संघटनांचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजाच्या सन्मानाचा प्रश्न असल्याने वक्तव्य करणाऱ्या समाजकंटकांविरोधात त्वरीत आणि कठोर कारवाई व्हावी, अन्यथा व्यापक आंदोलन छेडण्याचा इशारा या वेळी देण्यात आला.

TAGGED:
Share This Article
Leave a comment