“जन की बात” – आमदार शंकर जगतापांचा थेट जनसंवाद आज! काळेवाडीमध्ये नागरिकांच्या तक्रारींवर होणार ऑन-द-स्पॉट तोडगा

PCC NEWS
2 Min Read
{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"square_fit":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

“जन की बात” – आमदार शंकर जगतापांचा थेट जनसंवाद आज!

काळेवाडीमध्ये नागरिकांच्या तक्रारींवर होणार ऑन-द-स्पॉट तोडगा

पिंपरी चिंचवड दिनांक :१६ (युनूस खतीब) चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणींना थेट तोडगा मिळावा, यासाठी आमदार शंकर जगताप यांनी एक आगळावेगळा उपक्रम राबविला आहे. प्रभाग क्रमांक २२ मध्ये “जन की बात – संवाद | सेवा | समर्पण” या विशेष कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता काळेवाडीतील ज्योतिाबा मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात आमदार शंकर जगताप स्वतः उपस्थित राहून नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहेत. शासकीय योजना, पाणीपुरवठा, वीजपुरवठा, ड्रेनेज, रस्ते, तसेच महापालिकेशी संबंधित विविध प्रश्न यावर नागरिक थेट आपले मुद्दे मांडू शकतील.

तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी महानगरपालिका, महावितरण, पाणीपुरवठा विभागासह विविध शासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यामुळे नागरिकांच्या समस्या जागेवरच सोडविल्या जाण्याची अपेक्षा आहे.

या उपक्रमाबाबत बोलताना आमदार शंकर जगताप म्हणाले,

‘जन की बात’ हा केवळ संवादाचा कार्यक्रम नाही, तर सेवा आणि समर्पणाचा संकल्प आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संवाद आणि लोकसेवेचा मंत्र प्रत्यक्षात उतरवण्याचा हा प्रयत्न आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, या माध्यमातून नागरिकांच्या समस्या वेळेवर मार्गी लावून चिंचवड मतदारसंघ स्वच्छ, सुंदर आणि विकसित करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडाव्यात आणि त्यांचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन आमदारांनी केले.

Share This Article
Leave a comment