सदगुरू सेवालाल महाराज अश्वरूढ पुतळा चौथर्‍याच्या बांधकामाला त्वरित सुरुवात करा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करणार -प्रा संदेश चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष गोर सेना.

PCC NEWS
4 Min Read

सदगुरू सेवालाल महाराज अश्वरूढ पुतळा चौथर्‍याच्या बांधकामाला त्वरित सुरुवात करा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करणार -प्रा संदेश चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष गोर सेना.

पुणे : दिनांक 11 फेब्रुवारी 2025 (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) 10 फेब्रुवारी रोजी गडासिंग चिमा गाईन येरवडा,पुणे येथे सदगुरु सेवालाल महाराज अश्वारूढ पुतळा चौथ-याच्या बांधकामाला विरोध करणाऱ्यावर सक्त कार्यवाही कुरुन चौथर्‍याच्या बांधकामाला त्वरित सुरुवात करण्यात यावी या मागणीसाठी गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेशभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वात गोरसेना व गोर बंजारा समाजाच्या वतीने हाजारोंच्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट असा जन अकोश मोर्चा काढण्यात आला.

सविस्तर वृत्त असे की, सद्गुरू सेवालाल महाराज भारत देशातील १५ कोटी गोर बंजारा समाजाचे आराध्य दैवत असुन त्यांनी सर्व जातीधर्मातील लोकांसाठी मानवता, सहीष्णुता, सर्वधर्म समभाव हा, स्त्रि-पुरुस समानता, सारखी उच्च मुल्य जोपासण्याच्या दृष्टीने अतिशय अनमोल असे कार्य केलोले आहे तसेच या महाराष्ट्राला गोर बंजारा समाजाने हरितकांतीचे प्रणेते औद्योगिक क्रांतीचे प्रणेते मा वसंतरावजी नायक व सुधाकररावजी नायक यांच्यासारखे धडाडीचे दोन मुख्यमंत्री दिलेले आहे व त्यांच्या माध्यमातुन खऱ्या अर्थाने, या आधुनिक महाराष्ट्राच्या पायाभरणीचे काम झालेले आहे हे कोनीही नाकारू शकत नाही.

गड्‌डालिग चिमा गार्डन, येरवडा, पुणे येथे मागिल अनेक दिवसापासुन सतगुरू सेवालाल महाराज यांचे अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या दृष्टीने सतगुरु सेवालाल महाराज ट्रस्ट च्या वतिने सातत्याने प्रयत्न वं पाठपुरावा करुन ताकालीन आमदार टिंगरे साहेबांच्या माध्यमातुन पुतळ्याच्या चौथरा बांधकामासाठी रितसर शासकिय निधी उपलब्ध करून घेण्यात आले,तसे शासकिय कामाचे आदेश जिलाधिकारी कार्यालयामार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले व त्याप्रमाणे चौथर्‍याच्या बांधकामाला देखिल सुरुवात झाली होती परंतु कोही समाजकंटकांनी जळावू वृत्तीने या बांधकामाला आमचा विरोध आहे असे पत्रव्यवहार करून सार्वजनिक बाधकाम विभागाच्या अधिका-यांवर दबाव आनले व बांधकाम बंद करण्यास भाग पाडले.

म्हणून हे बांधकाम पुन्हा चालु करन्यात यावे या करिता गोर सेनेच्या वतिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सबंधित अधिकाऱ्यांकडून उडवा उडवी चे उत्तर देण्यात आले, संपूर्ण महाराष्ट्रातुन 21 जानेवारीला जिल्हाधिकारी पुणे यास अनेक निवेदन देऊन सुद्धा काहीच उपाय न झाल्यामुळे तारीख 10 फेब्रुवारी 2025 रोजी गड्डासिंग चिमा गार्डन, येरवडा येथुन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हजारोच्या संख्येने विशाल असे रॅलीची आयोजन करण्यात आले व जिल्हाधिकारी कारल्यासमोर रॅलीचे रूपांतर सभेत करण्यात आले.

या वेळी आपल्या भाषणामध्ये प्रा. संदेश भाऊ चव्हाण गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष,विजय भाऊ पवार, गोर सेना जिल्हा अध्यक्ष पुणे, यांनी जी लोक या पुतळ्याच्या चौथरा बांधकामासाठी विरोध करित आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन योग्य ती कार्यवाही करावी व चौथर्‍याचे बांधकाम त्वरित चालू करावे अन्यथा हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभरात आणखी तिव्रतेने केल्याशिवाय राहणार नाही असा सज्जड दम शासनाला दिला. व मोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

मोर्चाच्या प्रमुख मागण्या.

  1. सदगरु सेवालाल महाराज अश्वारूढ पुतळा-चौथर्‍याचे बांधकाम त्वरित चालु करावे.
  2. या बांधकामासाठी अडथळा निर्माण करणा-यांवर गुन्हे दाखल करु सक्त कार्यवाही करावी.
  3.  या बांधकामासाठी सक्षम अधिकाऱ्याची नेमणुक करावी.
  4. सद्गुरू सेवालाल महाराज अश्वारूढ पुतळा बसविण्याची परवानगी द्यावी.

हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी येरवडा ,पांडू लमाण वस्ती येथील समाजसेवक,व माजी नगरसेवक शंकर‌भाऊ चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी गोरसेनेचे पदाधिकारी, शंकर भाऊ चव्हाण गोर सेना प्रदेश सहसचिव, विजय भाऊ पवार गोर सेना जिल्हाध्यक्ष पुणे, अजय राठोड विभागीय अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र ॲड.आकाश राठोड, रविदादा पवार प्रफूल राठोड, धनराज राठोड, श्रावन राठोड,, यांनी विशेष मेहनत घेतली आणि, नगरसेविका श्वेता ताई चव्हाण, अमरसिंग राठोड, शंकर चव्हाण यांची विशेष उपस्थितीथी होती.

TAGGED:
Share This Article
Leave a comment