लोककलावंतांच्या आर्थिक हितासाठी विठाबाई (भाऊ मांग) नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावे – चंद्रकांत दादा लोंढे, महाराष्ट्र प्रदेश उपप्रमुख सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी.
पिंपरी चिंचवड दिनांक: ०७ फेब्रुवारी २०२५ (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) महाराष्ट्रातील कलावंत, कलाकार,तमाशा कलाकार, लोककलावंत, तंत्रज्ञ यांच्यासाठी विठाबाई ( भाऊ मांग) नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सामाजिक न्याय विभाग प्रदेश उपप्रमुख चंद्रकांत दादा लोंढे व पांडुरंग जगताप यांनी, पुणे उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी माननीय ज्योती कदम तसेच राज्याचे सांस्कृतिक कार्य कॅबिनेट मंत्री तसेच काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्याकडे करण्यात आली यावेळी सदर मागणी निवेदनात करण्यात आली.
महाराष्ट्रातील लोकनाट्य तमाशा कलाकारांबरोबरच सर्व कलाकार पडद्यामागील कलाकार, तंत्रज्ञ, गोसावी, भजन मंडळी, मुरळी,बँडवाले, नवकलाकार, शाहीर, गोंधळी, पेंटर, मूर्तिकार,साहित्यिक, लेखक,कीर्तनकार, गायक, वादक, नाट्यकलावंत, संगीतकार, वाघ्या मुरळी, झाडीपत्तेतील कलाकार यांच्यासह विविध क्षेत्रातील कलाकारांसाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून त्या महामंडळाला राष्ट्रीय लोककलावंत असलेल्या तमाशा सम्राट सम्राज्ञी विठाबाई ( भाऊ मांग) नारायणगावकर यांचे नाव द्यावे अशी मागणी आपणास करण्यात येत आहे.
तमाशा कलेला समृद्ध, लोकप्रिय करण्याच्या कार्यात तमाशासम्राज्ञी स्व.विठाबाई नारायणगावकर आणि त्यांच्या कुटुंबियांचे मोठे योगदानआहे, त्याच्या ज्येष्ठ बंधूंना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.
तमाशा कलेची आयुष्यभर सेवा करणाऱ्या स्व. विठाबाईं यांचे अखेरचे दिवस हलाखीत गेले. बहुतांश लोककलावंतांच्या वाट्याला हेच दुख येते त्याच्या आयुष्याचा शेवट हलाखीत जातो हे टाळण्यासाठी लोककलावंतांसाठी वृद्धापकाळात राहण्याची, जेवण्याची,औषधांची व्यवस्था केली पाहिजे.
त्यांच्यासाठी वृध्दाश्रम, अल्प व्याजदरात
कर्ज, मोफत आरोग्य सुविधा, मुलांच्या शिक्षणाची सोय असली पाहिजे.शासनाच्या विकासयोजनाचा लाभ कलावंतांपर्यत पोहोचवला पाहिजे.त्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची गरज आहे. राज्यातील लोककलावंतांकडूनही सातत्याने ही मागणी होत आहे.
कर्ज, मोफत आरोग्य सुविधा, मुलांच्या शिक्षणाची सोय असली पाहिजे.शासनाच्या विकासयोजनाचा लाभ कलावंतांपर्यत पोहोचवला पाहिजे.त्यासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची गरज आहे. राज्यातील लोककलावंतांकडूनही सातत्याने ही मागणी होत आहे.