मेट्रो सिटी आयकॉन 2024 पुरस्कार जाहीर.

PCC NEWS

मेट्रो सिटी आयकॉन 2024 पुरस्कार जाहीर.

शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या शुभहस्ते पुरस्काराचे वितरण.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मेघराज भोसले यांची प्रमुख उपस्थिती.

पिंपरी चिंचवड दिनांक : ३० डिसेंबर २०४ (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) पुणे व पिंपरी चिंचवड शहरात पत्रकारिता क्षेत्रात अग्रेसर असलेली शबनम न्यूज मीडिया ग्रुप या वृत्तसंस्थेच्या माध्यमातून दरवर्षी मेट्रो सिटी आयकॉन पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो. पुणे व पिंपरी चिंचवड शहरात सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, कायदे, क्रीडा, आरोग्य, मनोरंजन अशा अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा मेट्रोसिटी आयकॉन पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो, यावर्षी संस्थेच्या वतीने मेट्रोसिटी आयकॉन पुरस्काराचे मानकरी जाहीर करण्यात आले आहे.

दोन जानेवारी रोजी संपन्न होत असलेल्या या पुरस्कार सोहळ्यात शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या शुभहस्ते पुरस्कार वितरण करण्यात येत आहे. तसेच या कार्यक्रमाला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याचबरोबर सदर पुरस्कार सोहळ्यात चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप, पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष तथा माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, शिवसेना उपनेते तथा कामगार नेते इरफान भाई सय्यद, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले, सरिता साने सखी मंचच्या अध्यक्षा सरिता अरुण साने, प्रसिद्ध उद्योजक संतोष बारणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या पुरस्कार सोहळ्याचे मानकरी अधिरा इंटरनॅशनल स्कूल पुनावळे, निर्विकार आयुर्वेदिक हॉस्पिटल भोसरी, एडवोकेट कांता गोर्डे – शेजवळ, डॉक्टर सायली बारसे, युवा सामाजिक कार्यकर्ते बापू दिनकर कातळे, सौ. ज्योती गोफणे, सौ. ज्योती निंबाळकर, सौ. अंकिता राऊत, सौ. शैला निकम, श्रीमती शोभा उर्फ नानी जगताप, सौ ज्योती भालके, श्री. विजय जरे, श्री. प्रवीण माळी, सौ. कीर्ती जाधव, व सौ. मनीषा चंद्रकांत शिंदे यांना मेट्रोसिटी आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे सदर कार्यक्रम हा दोन जानेवारी रोजी ऑटो क्लस्टर सभागृह चिंचवड येथे दुपारी ३ वाजता संपन्न होत आहे.

तसेच या पुरस्कार सोहळ्यानिमित्त पिंपरी चिंचवड शहरात विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हटकर , डॉक्टर शैलेश देशपांडे, सामाजिक कार्यकर्ते संभाजी बारणे, वृत्तपत्र विक्रेते अनिल दळवी, माजी नगरसेविका अमिना पानसरे, पत्रकार बापू गोरे, एडवोकेट दीपक साबळे व सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर तसेच शिक्षक योगेश डावरे यांचा विशेष सन्मान या कार्यक्रमात करण्यात येत आहे.

याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरातील दहा महिला बचत गटांचा ही सन्मान करण्यात येत आहे यामध्ये प्रसन्न महिला बचत गट, निधी महिला बचत गट, मातोश्री महिला बचत गट, जिजाई महिला बचत गट, येसू महिला बचत गट,, श्री तुळजाई महिला बचत गट, श्री अंबिका महिला बचत गट, यशोधरा महिला बचत गट, जिजाऊ महिला बचत गट, क्रांती महिला बचत गट, वनमाला महिला बचत गट, सखी महिला बचत गट या महिला बचत गटांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रमात पिंपरी चिंचवड व पुणे शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शबनम न्यूज मीडिया ग्रुपच्या संस्थापिका शबनम सय्यद यांनी केले आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a comment