नेहरूनगरमधून सर्वाधिक लीड देणार – हनुमंत भोसले
माजी महापौरांचा विश्वास; परिवर्तनाचा शब्द नेहरूनगर खरा करणार.
नेहरूनगरचा अजित गव्हाणे यांना पाठिंबा; नेहरूनगर परिसराने गर्दीचा उच्चांक मोडला.

पिंपरी चिंचवड दिनांक : १० नोव्हेंबर २०२४ (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) भोसरी महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ नेहरूनगर, मासुळकर कॉलनी, अजमेरा या परिसरामध्ये रविवारी (दि.10) काढलेल्या प्रचार दौऱ्याला उच्चांकी प्रतिसाद मिळाला. रविवारी काढलेल्या या प्रचार दौऱ्याने आत्तापर्यंतच्या सर्व गर्दीचे अक्षरशः रेकॉर्ड मोडले. माजी महापौर हनुमंत भोसले यांनी नेहरूनगर मधून सर्वाधिक “लीड” अजित गव्हाणे यांना मिळवून देणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.
यावेळी माजी महापौर वैशाली घोडेकर,विरोधी पक्षनेते राहुल भोसले , माजी नगरसेवक समीर मासुळकर तसेच बबन शिंदे, मधुकर भसाड, विठ्ठल भसाड, दादा राजगुडे, चंद्रकांत महाराज घोडे , माणिकराव धाडगे, सचिन जाधव, नारायण पांढरे, जयंत शिंदे, संतोष लष्करे, अनिल यादव, किशोर गवई, अशोक बनसोडे, उत्तम जोगदंड, लक्ष्मण जोगदंड,शिवा उबाळे तसेच नेहरूनगर , मासुळकर कॉलनी, अजमेरा परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि महिला उपस्थित होत्या.
Leave a comment
Leave a comment