सांगवीतील पदयात्रेला महिला, युवक व ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.
पिंपरी चिंचवड दिनांक : १० नोव्हेंबर २०२४ (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) चिंचवड विधानसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी- आरपीआय (आठवले) व मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघातील नवी सांगवी परिसरात भव्य पदयात्रा काढत नागरिकांना अभिवादन केले. या पदयात्रेत जेष्ठ नागरिक, महिला व युवकांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. त्यामुळे आता चिंचवड विधानसभा मतदारसंघांमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलणार असा विश्वास जनतेतून व्यक्त होत आहे.
शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आज नवी सांगवी परिसरातील कृष्णा नगर, सह्याद्री कॉलनी, विद्यानगर, ज्ञानेश पार्क, नंदनवन कॉलनी, गुरुदत्त कॉलनी, साईनाथ कॉलनी, विनायक नगर, सुयोग कॉलनी, त्रिमूर्ती कॉलनी या भागात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी लाडक्या बहिणींकडून जगताप यांचे औक्षण केले जात होते. तसेच पुष्पवृष्टी करून जोरदार स्वागत करण्यात आले.
या प्रचार रॅलीमध्ये माजी नगरसेवक राजेंद्र राजापुरे, अंबरनाथ कांबळे, बळीराम जाधव, सांगवी – राहटणी मंडल उपाध्यक्ष कविता निखाडे, शितल आगरखेड, बळीराम जाधव, सूर्यकांत गोफणे, बाबुराव शितोळे, सखाराम रेडेकर, प्रशांत कडलक, बाळासाहेब पिल्लेवार, सुरेश तावरे, राजू पाटील, आप्पा पाटील, शामराव पालांडे, संदीप दरेकर, राजू मोरे, सुनील कोकाटे, गणेश बनकर, देविदास शेलार, उमेश दरेकर, सुरेश शिंदे, किशोर शिंदे, शिवशरण टेंगळे, बसवराज हिरेमठ, जयसिंग जाधव, अभय नरवडेकर, अमित घोडसाळ, चंद्रकांत बेंडे, उमेश दरेकर, संजय मराठे, साई कोंढरे, लालासाहेब ढोरे, शिरीष कवडे, राजू नागणे, ज्ञानेश्वर खैरे, सचिन खराडे, विशाल खैरे, संभाजी भेगडे, गिरीश देवकाते, विक्रम भेगडे, मनीष भापकर, राजेश साळुंखे, पवन साळुंखे, प्रवीण जाधव, अशोक कवडे, अविनाश खुंटे, प्रवीण पाटील, योगेश कदम, ललित मसेकर, शैलेश जाधव, मनीष रेडेकर, विकी रेडेकर, विशाल गायकवाड, संतोष पाटील, रामदास पोखरकर, रवींद्र रासने, रविकुमार चौधरी, प्रवीण देवासे, संभाजी ढवळे, श्रीकांत पवार, शंकर ननावरे, गोविंद मुखणे, अमित कानडे, गोरसे सर, योगेश कदम यांच्यासह नवी सांगवीतील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच महिला वर्ग, युवा वर्ग, तसेच महायुतीचे आजी-माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान, नवी सांगवी परिसरातील सर्व आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, डॉक्टर, वकील, जेष्ठ नागरिक व महिला मंडळ तसेच प्रभागातील सर्व धार्मिक स्थळांच्या प्रमुखांची भेट घेत प्रभागातील सर्व सोसायटींचे चेअरमन, सदस्य आणि सार्वजनिक मंडळ यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत जगताप यांनी विधानसभेच्या विजयासाठी आशीर्वाद घेतले.
येणाऱ्या काळात चिंचवड विधानसभा मतदार संघातील विविध विकासकामांवर लक्ष केंद्रित करणार असून सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करणार आहे. या मतदार संघातील प्रश्न विधानसभेत मांडून ते सोडविण्यावर भर देणार आहे. स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी दहा वर्षात चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जी विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार केली त्याच माध्यमातून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम आपल्या सर्वांच्या सहकार्याने व आशीर्वादाने करणार आहे. आज या पदयात्रेत सहभागी झालेला प्रत्येकजण विजयाचा संकल्प घेऊन आला आहे. त्यामुळे महायुतीचा महाविजय निश्चित होणार असा मला विश्वास आहे.
– शंकर जगताप (महायुतीचे अधिकृत उमेदवार)