संपूर्ण मतदारसंघात मेट्रोचे जाळे उभारणार, सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करणार.

PCC NEWS

संपूर्ण मतदारसंघात मेट्रोचे जाळे उभारणार, सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करणार.

आ. अण्णा बनसोडे यांचे आश्वासन.

पिंपरी चिंचवड दिनांक ०८ नोव्हेंबर २०२४ (पीसीसी न्यूज प्रतिनिधी ) पिंपरी मतदार संघात मेट्रोचे जाळे उभारण्यात येईल. विधानसभा मतदारसंघातील सर्व झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत स्वस्त दरात घरे उपलब्ध करण्यावर भर देण्यात येईल असे आश्वासन पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांनी फुगेवाडी येथे दिले.

पिंपरी विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रचारार्थ फुगेवाडी, कुंदन नगर परिसरात भव्य पदयात्रा काढण्यात आली. यावेळी भारत नगर बुद्ध विहार येथे तरुणांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेविका उषाताई वाखारे, संध्याताई गायकवाड, माई काटे, किरण मोटे , संजय नाना काटे, प्रशांत फुगे तसेच प्रा. मनोज वाखारे, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, ॲड. अतिश लांडगे, निलेश हाके, ओमकार वाखारे, दीपक शिंदे, बादशाह भाई शेख, अख्तर शेख, युवराज गायकवाड, बाळाभाऊ ढवाण, अनिकेत डोळस, सागर फुगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आमदार बनसोडे म्हणाले की, शहरातील मतदार संघातील पाच रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरण, दापोडी येथील त्रैलोक्य बौद्ध विहारास आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करणे, ज्येष्ठ नागरिक संघासाठी अध्ययावत जेष्ठ नागरिक भवन उभारणे यासाठीही आपण प्रयत्न करणार आहोत.

आमदार बनसोडे यांनी फुगेवाडी येथील विठ्ठल मंदिर तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होत पदयात्रेला सुरुवात केली. ओमकार मित्र मंडळ (साई मंडळ), आझाद मंदिर मंडळ, संजय नगर, मस्जिद, वाखारे चाळ, श्री स्वामी समर्थ चौक, जय महाराष्ट्र चौक, स्टार स्पोर्ट्स कॉर्नर, नवरंग मित्र मंडळ, वेताळ बाबा मंदिर, स्टार स्पोर्ट्स, साईनाथ मित्र मंडळ, रविलाल वस्ती, भारत नगर बुद्ध विहार, सुभाष तरुण मंडळ या मार्गाने येत कुंदन नगर येथे पदयात्रेची सांगता करण्यात आली. या पदयात्रेत आमदार अण्णा बनसोडे यांनी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत तरुणांशी संवाद साधला. ठिकठिकाणी महिला भगिनींनी त्यांना औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या.

TAGGED:
Share This Article
Leave a comment