पिंपरी चिंचवड दिनांक : ०५ नोव्हेंबर २०२४ (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचा वावर असल्याने येणाऱ्या, जाणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. यामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागावतीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी पत्रकार, शमीम हुसेन सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा गजाला सय्यद यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त शेखर सिंह यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, “पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव या परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. मोठ्या प्रमाणात कुत्र्यांचा वावर असल्याने येणाऱ्या, जाणाऱ्या नागरिकांना त्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रात्री- अपरात्री कामगार या थेरगाव परिसरात येत जात असतात, त्यांना या कुत्र्यांपासून भीती निर्माण झाली आहे. लहान मुलांना तसेच महिलांना इजा होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागा वतीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा.
तसेच सदर कारवाई महानगरपालिका वतीने लवकरात लवकर करण्यात यावी. अन्यथा, थेरगाव परिसरात नागरिक व आमच्या शमीम हुसेन फाउंडेशन वतीने आंदोलन करण्याचे येईल याची नोंद घ्यावी. व लवकरात लवकर कारवाई करावी आपल्याकडून तत्पर कारवाई करण्याची अपेक्षा आहे, असेही सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.