काँग्रेसची स्थिती महाराष्ट्र निवडणुकीत हरियाणाप्रमाणे होईल- प्रफुल्ल पटेल.

PCC NEWS
1 Min Read

अतिआत्मविश्वासामुळे काँग्रेसला महाराष्ट्र निवडणुकीत हरियाणा सारख्या पराभवाला समोरे जावे लागेल, प्रफुल्ल पटेल यांचा इशारा.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज काँग्रेसवर टीका केली. भारतीय क्रिकेट संघाचा न्यूझीलंडकडून अनपेक्षित पराभव झाल्याचा हवाला देत पटेल म्हणाले, ” आत्मविश्वास खूप मोठा आहे, पण वास्तविकता तपासणे चांगले आहे.”क्रिकेटची तुलना करून ते म्हणाले की, भारतीय संघाचा पराभव हा ‘नम्रतेचा धडा’ आहे, असा टोला त्यांनी लगावला असून, आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अतिआत्मविश्वास बाळगल्याबद्दल काँग्रेसवर टीका केली आहे.

आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी असेही म्हटले आहे की,”काँग्रेस, हरियाणाच्या पराभवाचे उदाहरण ताजे असताना, असे दिसते की कॉंग्रेसची महाराष्ट्रात आघाडी मिळविण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसला इशारा मिळाला आहे की, विरोधकांना कमजोर समजल्याने अनपेक्षित आणि प्रतिकूल परिणाम होऊ शकतात.

TAGGED:
Share This Article
Leave a comment