अजित गव्हाणे यांच्या प्रचारात घुमला ‘राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी’चा नारा.

PCC NEWS

अजित गव्हाणे यांच्या प्रचारात घुमला ‘राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी’चा नारा.

पिंपरी चिंचवड दिनांक ३० ऑक्टोबर २०२४ (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) भोसरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ आज (बुधवारी) प्रचार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने गव्हाणे यांनी मतदारांशी संपर्क साधला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बुधवारी कार्यकर्त्यांनी मोठ्या जोशात त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यावेळी “राम कृष्ण हरी वाजवा तुतारी” अशी घोषणा ठिकठिकाणी ऐकायला मिळत होती.

अजित गव्हाणे यांनी बुधवारी झंझावाती प्रचार दौरा केला. यावेळी नागरिकांनी फटाके वाजून त्यांचे स्वागत केले. महिलांनी ठिकठिकाणी त्यांचे औक्षण करून “विजयाचा तिलक” लावला. दिघी रोड, स्वामी समर्थ कॉलनी, शिवशक्ती मित्र मंडळ रस्ता, संभाजी नगर, आळंदी रोड, ओम साई कॉलनी, संत तुकाराम नगर, श्रीराम कॉलनी या ठिकाणी प्रचार दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गव्हाणे यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. येथील व्यापाऱ्यांशी त्यांना येणाऱ्या समस्यांबाबत चर्चा केली. मतदारांशी संवाद साधताना येथील प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी परिवर्तन गरजेचे आहे असे यावेळी गव्हाणे म्हणाले.

दरम्यान “राम कृष्ण हरी वाजवा तुतारी”, तुतारी वाजणार बदल घडणार, अशा घोषणांनी भोसरी परिसर दुमदुमून गेला होता.

माजी नगरसेवकांची उपस्थिती लक्षवेधी.

दरम्यान या आजच्या प्रचार दौऱ्यात माजी नगरसेवकांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. यावेळी माजी नगरसेविका प्रियांका बारसे म्हणाल्या, भोसरी मतदारसंघात गेल्या दहा वर्षात दुजभावाची वागणूक दिली गेली. प्रत्येक ठिकाणी दादागिरी, मोजक्याच लोकांना, त्याच त्या लोकांना ठेकेदारी देणे असे प्रकार वाढत आहे. नगरसेवकांना देखील कामाचे कोणतेही स्वातंत्र्य मिळू दिले नाही त्यामुळेच आम्ही सर्व नाराज आहोत या नाराजीतूनच भोसरी विधानसभेत परिवर्तन अटळ आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a comment