सुलक्षणा शीलवंत धर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पिंपरी विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर.
Share
1 Min Read
SHARE
सुलक्षणा शीलवंत धर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पिंपरी विधानसभेसाठी उमेदवारी जाहीर.
पिंपरी चिंचवड दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ (पीसीसी न्यूज प्रतिनिधी ) पिंपरी विधानसभेची जागा तुतारीलाच सुटली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नुकतेच पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली.
पिंपरी पिंपरी विधानसभेत तुतारी वाजणार की मशाल पेटणार यावरून गेल्या दोन-तीन दिवसांपासून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते.
अनेक अफवांचा बाजारही काहीजण पसरवत होते. मात्र या चर्चांना आता पूर्णविराम लागला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांकडून माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून अण्णा बनसोडे विरुद्ध शरदचंद्र पवार पक्षाकडून सुलक्षणा शिलवंत अशी थेट लढत या मतदारसंघात होणार आहे.