राज्यात धार्मिक ध्रुवीकरण रोखण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा.
सामाजिक सलोखा ऐक्य परिषदेत अल्पसंख्याकांसह सर्व धर्म प्रतिनिधींची भूमिका.
पिंपरी, पुणे (दि. २३ ऑक्टोबर २०२४) मागील अकरा वर्षांपासून निवडणूक काळात देशभर जाती – धर्मात तेढ निर्माण करीत, धार्मिक ध्रुवीकरण करून मतांची मागणी केली जात आहेत. त्यामुळे अल्पसंख्याकांसह सर्व छोट्या सामाजिक घटकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. पुरोगामी विचारांचा पुरस्कार करीत शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांना आदर्श मानून महाराष्ट्र नेहमीच देशात अग्रेसर राहिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीत आगामी विधानसभा निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरण रोखण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय सामाजिक सलोखा ऐक्य परिषदेत घेण्यात आला आहे अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष मुफ्ती अहमद हसन कासमी यांनी दिली.
सामाजिक सलोखा ऐक्य परिषदेच्या वतीने बुधवारी चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बिशप सॅम्युअल साखरपेरकर, पास्टर नितीन काळे, शौल विश्वास कांबळे आदींसह विविध समाज प्रतिनिधी उपस्थित होते.
सामाजिक सलोखा ऐक्य परिषदेच्या वतीने बुधवारी चिंचवड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बिशप सॅम्युअल साखरपेरकर, पास्टर नितीन काळे, शौल विश्वास कांबळे आदींसह विविध समाज प्रतिनिधी उपस्थित होते.