चिंचवडमध्ये भाजपचाच विजय… विजय शिंदे यांची बॅनरबाजी चर्चेत.
एकनिष्ठ पक्षाचा निर्धार विजयाचा… शितल उर्फ विजय शिंदे यांचे ब्रॅण्डिंग चर्चेत.
पिंपरी चिंचवड दिनांक 4 ऑक्टोंबर 2024 (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीचे बिगुल केव्हाही वाजणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमधून अनेक जण इच्छुक आहेत. विधानसभेसाठी शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालत होताना दिसत आहे. सर्वाधिक मोठा मतदारसंघ असणाऱ्या चिंचवड मतदारसंघात भाजपचे निष्ठावान असणारे नगरसेवक शितल उर्फ विजय शिंदे यांनी लावलेल्या एकनिष्ठ पक्षाचा निर्धार विजयाचा… होर्डिंगची शहरात नव्याने चर्चा जोरदार सुरू झाली आहे. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या “चिंचवडमध्ये भाजपचाच विजय” य वाक्याने चिंचवड विधानसभेत भाजप नवीन चेहऱ्याला संधी देणार का? अशा चर्चाना वेग आला आहे.
पक्ष तोच चेहरा नवीन….
चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून विद्यमान आमदारासह, शहराध्यक्ष, माजी नगरसेवक आणि भाजपमधील विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्या मुशीत तयार झालेले नेतृत्व इच्छुक आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात 2014 पासून सलग तीन आमदार निवडून येत अबाधितपणे भाजपचे कमळ फुलले आहे. घराणेशाहीला भाजपच्या अनेक नगरसेवकांनी विरोध केला आहे. दहा ते पंधरा नगरसेवकांचा वेगळा गट तयार होऊन प्रसंगी बंडाच्या पवित्र्यात आहे. यामुळे भाजप व आरएसएस कडून चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी देताना नवीन चेहरा देण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याचे चर्चांना जोर असताना शितल उर्फ विजय शिंदे यांच्या नव्याने पलेक्सबाजीमुळे एकनिष्ठ पक्षनिष्ठ नेतृत्वासाठी काही घडामोडी सुरू आहेत असे दिसते.
चिंचवडला हवा पक्षनिष्ठ आमदार…
चिंचवड विधानभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा प्रभाव आहे. भाजपला मानणारा मतदार मोठ्या प्रमाणावर असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत संघाच्या विचाराचा आमदार चिंचवडसाठी हवा आहे अशी चर्चांना जोर धरला आहे. विद्यमान आमदारसह शहराध्यक्ष व अनेक माजी नगरसेवकांनी उमेदवारी मागितली आहे. सर्व इच्छुकांची पार्श्वभूमी पाहिली असता चिंचवड मधील एकमेव शितल उर्फ विजय शिंदे यांची राजकीय सुरुवात आरएसएस विचारधारेपासून झाल्याची दिसते. 2014 पासून चिंचवड विधानसभेवर भाजपचे कमळ फुलले आहे. इच्छुकांच्या भाऊ गर्दीत मतदारसंघ हातातून जाऊ नये. यासाठी आरएसएस स्वतः पक्षाशी आणि आपल्या विचारांशी समरूप असणारा स्वच्छ चारित्र्याचा चेहरा मैदानात उतरवणार असे वातावरण दिसत आहे.
राज्यात महायुती सरकार सत्तेत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील पदाधिकारी यांनीही या मतदारसंघावर दावा केला आहे. परंतु ज्यांचा आमदार त्या पक्षाला ठिकाणी जागा मिळणार असल्याने चिंचवडमध्ये महायुतीचा उमेदवार भाजपचाच असणार आहे. सर्व इच्छुकांमधील पार्श्वभूमी पाहता चिंचवड विधानसभेसाठी भाजप स्वच्छ चारित्र्याचा व भाजपच्या कुशीत तयार झालेला उमेदवार देईल आणि तो सर्व इच्छुकांना मान्य करावा लागणार आहे.
भाजप धक्का तंत्र वापरत आरएसएसच्या कुशीतील शितल उर्फ विजय शिंदे यांना उमेदवारी देऊन सर्वांना धक्का देऊ शकतात अशीही चर्चा सुरू झाली.
भाजप धक्का तंत्र वापरत आरएसएसच्या कुशीतील शितल उर्फ विजय शिंदे यांना उमेदवारी देऊन सर्वांना धक्का देऊ शकतात अशीही चर्चा सुरू झाली.