बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील महापालिकेच्या आरक्षित जागेवर क्रीडांगण व उद्यानाला अखेर मंजुरी !

PCC NEWS

बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील महापालिकेच्या आरक्षित जागेवर क्रीडांगण व उद्यानाला अखेर मंजुरी !

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी शहर-जिल्हा उपाध्यक्ष अतिश बारणे यांची पार्थ पवार व आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती मागणी.

पिंपरी चिंचवड दिनांक १८ सप्टेंबर २०२४ (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) मोशी बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील बारणे पाटील चौक परिसरातील गट क्रमांक २३० (१३४७) येथील ६४ गुंठ्यावर महापालिकेचे आरक्षण आहे. या ठिकाणी पालिकेचे क्रीडांगण, उद्यान व मंदिर होण्याबाबत पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी शहर-जिल्हा उपाध्यक्ष अतिश बारणे यांची आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवदेनाद्वारे मागणी करण्यात आली होती.

नुकतीच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ अजितदादा पवार यांनी शहर उपाध्यक्ष अतिश बारणे यांच्या माध्यमातून भेट दिली होती. यावेळी परिसरातील जवळपास २७ सोसायट्यांच्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाशी यांच्या मागणीच्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरीक, महिला आणि विविध सोसायटीतील रहिवाश्यांनी पार्थ पवार यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी आपण आयुक्तांना तशा सूचना देऊन या ठिकाणी येथील रहिवाशांच्या मागणीनुसार उद्यान, मंदिर व क्रीडांगण होण्यासाठी प्रयत्न करू, यावेळी हे काम त्वरित सुरू करण्याच्या अनुषंगाने आयुक्तांना आदेश देण्यात येतील असे स्पष्ट केले होते.तसेच ज्येष्ठ नागरीक, महिलांनी ज्या समस्या मांडल्या त्या सोडविण्यासाठी ही प्राधान्य देण्यात येईल,असे आश्वासन पार्थ पवार यांनी दिले होते.

त्या बद्दल सविस्तर माहिती अशी की बोऱ्हाडेवाडी मोशी येथील गट क्र. २३० (१३४७) येथील ६४ गुंठे जागा ही पालिकेने आरक्षित केलेली आहे.या जागेवर पालिकेने लहान मुला-मुलींना कराटे, क्रिकेट, व्हॉलीबॉल, कब्बड्डी, खो-खो, फुटबॉल यांसारखे खेळ खेळण्यासाठी क्रीडांगण, जेष्ठ नागरिकांसाठी उद्यान व सांप्रदायिक नागरिकांसाठी स्वामीचे व श्री गणेशाचे मंदिर व्हावे. कारण जवळपास १८ हजार पेक्षा जास्त लोकसंख्या या ठिकाणी आहे,तसेच आजूबाजूला पालिकेचे कोणतेही क्रीडांगण, उद्यान व मंदिर नाहीत. त्यामुळे पालिकेचे येथे क्रीडांगण, उद्यान व मंदिर व्हावे, अशी मागणी आता जोर धरू लागली असताना मा.अतिश बारणे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून अखेर त्या कामाला यश आले असून सदर कामाला मंजुरी मिळाली असून महानगरपालिकेचे सह शहर अभियंता मनोज सेठीया यांनी प्रत्यक्ष भेट देऊन काम सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.

Contents
बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील महापालिकेच्या आरक्षित जागेवर क्रीडांगण व उद्यानाला अखेर मंजुरी !पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी शहर-जिल्हा उपाध्यक्ष अतिश बारणे यांची पार्थ पवार व आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती मागणी.पिंपरी चिंचवड दिनांक १८ सप्टेंबर २०२४ (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) मोशी बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील बारणे पाटील चौक परिसरातील गट क्रमांक २३० (१३४७) येथील ६४ गुंठ्यावर महापालिकेचे आरक्षण आहे. या ठिकाणी पालिकेचे क्रीडांगण, उद्यान व मंदिर होण्याबाबत पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी शहर-जिल्हा उपाध्यक्ष अतिश बारणे यांची आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे निवदेनाद्वारे मागणी करण्यात आली होती.नुकतीच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ अजितदादा पवार यांनी शहर उपाध्यक्ष अतिश बारणे यांच्या माध्यमातून भेट दिली होती. यावेळी परिसरातील जवळपास २७ सोसायट्यांच्यांमध्ये राहणाऱ्या रहिवाशी यांच्या मागणीच्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरीक, महिला आणि विविध सोसायटीतील रहिवाश्यांनी पार्थ पवार यांच्याशी संवाद साधला होता. त्यावेळी आपण आयुक्तांना तशा सूचना देऊन या ठिकाणी येथील रहिवाशांच्या मागणीनुसार उद्यान, मंदिर व क्रीडांगण होण्यासाठी प्रयत्न करू, यावेळी हे काम त्वरित सुरू करण्याच्या अनुषंगाने आयुक्तांना आदेश देण्यात येतील असे स्पष्ट केले होते.तसेच ज्येष्ठ नागरीक, महिलांनी ज्या समस्या मांडल्या त्या सोडविण्यासाठी ही प्राधान्य देण्यात येईल,असे आश्वासन पार्थ पवार यांनी दिले होते.त्या बद्दल सविस्तर माहिती अशी की बोऱ्हाडेवाडी मोशी येथील गट क्र. २३० (१३४७) येथील ६४ गुंठे जागा ही पालिकेने आरक्षित केलेली आहे.या जागेवर पालिकेने लहान मुला-मुलींना कराटे, क्रिकेट, व्हॉलीबॉल, कब्बड्डी, खो-खो, फुटबॉल यांसारखे खेळ खेळण्यासाठी क्रीडांगण, जेष्ठ नागरिकांसाठी उद्यान व सांप्रदायिक नागरिकांसाठी स्वामीचे व श्री गणेशाचे मंदिर व्हावे. कारण जवळपास १८ हजार पेक्षा जास्त लोकसंख्या या ठिकाणी आहे,तसेच आजूबाजूला पालिकेचे कोणतेही क्रीडांगण, उद्यान व मंदिर नाहीत. त्यामुळे पालिकेचे येथे क्रीडांगण, उद्यान व मंदिर व्हावे, अशी मागणी आता जोर धरू लागली असताना मा.अतिश बारणे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून अखेर त्या कामाला यश आले असून सदर कामाला मंजुरी मिळाली असून महानगरपालिकेचे सह शहर अभियंता मनोज सेठीया यांनी प्रत्यक्ष भेट देऊन काम सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
TAGGED:
Share This Article
Leave a comment