काँग्रेसला मतदारसंघ मिळणे हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच – डॉ. कैलास कदम.

PCC NEWS

काँग्रेसला मतदारसंघ मिळणे हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो मिळवणारच – डॉ. कैलास कदम.

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रांतध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार आज शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारिणीची आढावा बैठक खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात पार पडली.

याप्रसंगी शहराध्यक्ष कैलास कदम यांनी पिंपरी ,चिंचवड, भोसरी ब्लॉक कमिटीच्या प्रभाग प्रमाणे बूथ प्रतिनिधींचा आढावा घेतला, यावेळी बोलताना कैलास कदम म्हणाले, सर्व मतदारसंघात बूथस्तरावर पक्षाचे पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी बांधणी करावी, प्रदेश पातळीच्या सूचनेवरून योग्य ते बूथ प्रतिनिधी नेमणूक करून त्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, निवडणुकीचा कालावधी कमी राहिल्याने दिवस रात्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम करावे.

तसेच नवीन मतदार नोंदणी देखील जास्तीत जास्त मतदार नोंद करण्यात यावी. विधानसभा व त्यानंतर होणारी महानगरपालिका यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, पिंपरी, चिंचवड, भोसरी हे तिन्ही मतदारसंघ ही काँग्रेसला मिळणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच असा संकल्प घेऊन मैदानात उतरून काम करूया, पक्षश्रेष्ठींना देखील अशा प्रकारची मागणी शहर काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे, पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता हाच काँग्रेसचा उमेदवार म्हणून येणाऱ्या काळात दिसेल असे आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले.
याप्रसंगी माजी महिला काँगेस प्रदेशाध्यक्षा सौ. श्यामला सोनवणे, पर्यावरण विभाग माजी प्रदेशाध्यक्ष अशोक मोरे, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब मुगुटमल, संदेश नवले, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पर्यावरण विभाग सरचिटणीस अमर नाणेकर, प्रदेश कॉंग्रेस सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्ष वाहब शेख, प्रदेश कॉंग्रेस सामाजिक न्याय विभाग उपाध्यक्ष चंद्रकांत लोंढे, वरिष्ठ उपाध्यक्ष मयूर जयस्वाल, अॅड. अनिरुध्द कांबळे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष माऊली मलशेट्टी, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, सेवादल अध्यक्ष प्रा. किरण खाजेकर, प्रोफेशनल कॉंग्रेस अध्यक्ष दाहर मुजावर, झोपडपट्टी सेल अध्यक्ष प्रा, बी, बी. कांबळे, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अॅड. अशोक धायगुडे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव व राष्ट्रीय प्रवक्ते गौरव चौधरी, व्यापारी सेलचे अमरजीतसिंग पाथीवाल, शहर उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, सोमनाथ शेळके, मेहबूब शेख, अर्चना राऊत, स्मिता पवार-मुलाणी, अबूबकर लांडगे, शहर सरचिटणीस जार्ज मॅथ्यू, मून्साफअली खान, निखिल भोईर, आण्णासाहेब कसबे, सतीश भोसले, वसंत वावरे, जुबेर खान, रवींद्र कांबळे, शहर सचिव अॅड. मोहन अडसूळ, आकाश शिंदे, योगेश बहिरट, युनूस बागवान पिंपरी ब्लॉक उपाध्यक्षा ज्योती गायकवाड, शहाबुद्दीन शेख, मकरध्वज यादव, विशाल कसबे, आप्पासाहेब सोनावणे, प्रतिक जगताप, पांडुरंग जगताप, बाजीराव आल्हाट, श्रेयश लाटकर, अरुण वानखेडे, आर. जी. ओव्हाळ, फिरोज तांबोळी, संगमेश्वर गंगापुरे, अंगद काशिद आदींसह या बैठकीस शहर काँग्रेस मधील आजी-माजी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

TAGGED:
Share This Article
Leave a comment