विशाळगड दंगल प्रकरणी आरोपीवर UAPA अंतर्गत कारवाई करण्यात यावी – शहाबुद्दीन शेख.

PCC NEWS

विशाळगड दंगल प्रकरणी आरोपीवर UAPA अंतर्गत कारवाई करण्यात यावी – शहाबुद्दीन शेख.

पिंपरी चिंचवड दिनांक १८ जुलै २०२४ (पीसीसी न्यूज प्रतिनिधी) विशालगड दंगल प्रकरणी पिंपरी चिंचवडचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना लोकशाही युवा फाउंडेशन (महाराष्ट्र राज्य) संस्थापक अध्यक्ष शहाबुद्दीन शेख यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

पीसीसी न्यूजच्या प्रतिनिधीशी बोलताना शहाबुद्दीन शेख म्हणाले विशाळगड लगत राजापूर गावातील मुस्लिम समाजावर हल्ल्याविषयी आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलेले आहे त्याचे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.

14 जुलै 2024 रोजी कोल्हापूर येथील विशाळगड पायथ्याजवळ असलेल्या गजापुर या गावातील मुस्लिम समुदायाच्या घरावर तसेच मशिदीवर सुमारे 1000 जणांचा स्वतःला हिंदुत्ववादी बनवणाऱ्या हिंसक जमावाकडून हल्ला करण्यात आलेला होता.

सदर घटनेमुळे संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात असून यातील दोषी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम्ही करत आहोत.

सदर हल्ला होण्याचे संपूर्ण माहिती जिल्हा व राज्य प्रशासनाला माहिती असताना देखील हा हल्ला होणे गंभीर आहे.

किंबहुना या हल्ल्याला राज्य सरकारचा पाठिंबा आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

या घटनेतील आरोपी म्हणून सहभागी असलेल्या टोळ्यांकडून राज्यात सर्वात धुमाकूळ घातला आहे.

अशा गुन्हेगारांवर त्यांच्या नेत्यांवर त्यांच्या संघटनावर व त्यांच्या सहयोगी व अर्थ पुरवठा करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करणे आवश्यक झालेले आहे.

सदर घटनेमुळे स्थानिक अन्यायग्रस्त लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून यामध्ये घरांचे वाहनांचे दुकानांचे व इतर स्थावर मालमत्तेचे मोठे नुकसान झालेले आहे याची नुकसान भरपाई होणे आवश्यकच आहे.

सदर दंगलीतील दोषीविरुद्ध यु ए पी ए अंतर्गत गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करण्यात यावी.

सदर घटनेकडे दुर्लक्ष करणारे व जबाबदार असणारे राज्य सरकार व कोल्हापूर जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यासह जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांना देखील गुन्ह्यात आरोपी करण्यात यावे.

सदर घटनेत नुकसान झालेल्या घर दुकान वाहन व इतर स्थावर मालमत्तेची पूर्ण उभारणी करण्यात करण्यासाठी शंभर टक्के पुनर्वसन राशी देण्यात यावी.

सदर घटनेत दंगल ग्रस्त ठरलेल्या प्रति व्यक्ती दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी.

सदर घटनेच्या अनुषंगाने दाखल होण्यातील संशयित आरोपी असलेल्या निवृत्त राज्यसभा सदस्य संभाजी व त्यांचे इतर सहकाऱ्यांवर तात्काळ अटकेची कारवाई करण्यात यावी.

सदर अनुषंगाने आपणास आवश्यक वाटेल त्या योग्य उपाययोजना कराव्यात सदर प्रमाणे सत्वर कारवाई होणे आवश्यक आहे.

सदरील निवेदन देताना लोकशाही युवा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष युनूस भाई बेग, सामाजिक कार्यकर्ते हाजी गुलाम रसूल, मयूर भाई जैस्वाल गौरव चौधरी, अलीम भाई शेख, इत्यादी उपस्थित होते.

TAGGED:
Share This Article
Leave a comment