पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सोमवारी दि.८ जुलै रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत जनसंवाद सभा होणार.

PCC NEWS
1 Min Read
उष्णतेची लाट

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सोमवारी दि.८ जुलै रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत जनसंवाद सभा होणार.

पिंपरी चिंचवड दिनांक दि.७ जुलै २०२४ पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या सोमवार दि.८ जुलै रोजी सकाळी १० ते १२ यावेळेत जनसंवाद सभा होणार आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणा-या विकासकामांमध्ये नागरिकांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय महिन्यातील दुस-या आणि चौथ्या सोमवारी सकाळी १० ते १२ या वेळेत महापालिकेच्या वतीने जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत असते. या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या असून ते या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.

TAGGED:
Share This Article
Leave a comment