पुणे मेट्रोच्या पीसीएमसी-निगडी मेट्रो खांब (पिलर) बांधण्याचे काम सुरू.
पीसीएमसी-निगडी मार्गिका 1 च्या विस्तारिकरणाचा पुणे मेट्रोकडून पहिल्या पियर ची पायाभरणी.
पुणे, ७ जुलै २०२४: पुणे मेट्रोच्या पीसीएमसी-निगडी मार्गावरील पहिल्या खांबाच्या पायाचे काँक्रीटच्या (Piller foundation concrete) कामाला अण्णाभाऊ साठे पीएमपीएमल बस आगार, निगडी येथे भक्ती-शक्तीजवळ सुरुवात झाली.
सर्व आवश्यक भू-तपासण्यांनंतर हा महत्त्वपूर्ण या कामाला सुरुवात करण्यात आली. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री श्रावण हर्डीकर, पीसीएमसीचे आयुक्त श्री. शेखर सिंग, संचालक श्री. अतुल गाडगीळ, संचालक श्री. विनोद अग्रवाल, कार्यकारी संचालक प्रशासन आणि जनसंपर्क डॉ. हेमंत सोनवणे,पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विशेष अधिकारी किरण गायकवाड,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि इतर मेट्रो आणि पीसीएमसी व पीएमपीएमलचे अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या उत्तर-दक्षिण मार्गिकेवरील पिंपरी चिंचवड ते निगडी (भक्ती शक्ती चौक) या ४.५१९ किमी लांबीच्या उन्नत मार्गिकेच्या व्हायाडक्टचे काम दिनांक १५ मार्च २०२४ रोजी रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) या कंपनीला देण्यात आले आहे. हा प्रकल्प १३० आठवड्यांत पूर्ण होणार आहे आणि त्यात चार स्थानके असतील: चिंचवड, आकुर्डी, निगडी आणि भक्ती-शक्ती. या मार्गाच्या व्हायडक्त बांधकामासाठी १५१ स्पॅन आणि ११८१ सेगमेंट ची आवश्यकता लागणार आहे. RUNL ने तळेगाव जवळ सेगमेंट व गर्डर बनावीन्याला सुरुवात केली आहे.