राष्ट्रवादी लक्षद्वीपचे खासदार मोहंमद फैजल यांचा भोसरी विधानसभेतील युवकांशी संवाद.

PCC NEWS

राष्ट्रवादी लक्षद्वीपचे खासदार मोहंमद फैजल यांचा भोसरी विधानसभेतील युवकांशी संवाद.

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ भोसरी,निगडी,इंद्रायणी नगर परिसरात घेतल्या भेटीगाठी.

शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संसदरत्न खासदार डॉ अमोलदादा कोल्हे यांच्या प्रचार्राथ लक्षद्वीप चे खासदार मोहंमद फैजल यांनी इंद्रायणी नगर येथे अल्पसंख्याक समाजाच्या प्रमुख व्यक्तींशी संवाद साधला. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्याशी निगडी ओटास्किम परिसरात संवाद साधला. यावेळी खासदार मोहंमद फैजल यांनी देशातील एकूण परिस्तिथी वर युवकांना मार्गदर्शन केले.या वेळी बोलताना ते. म्हणाले “या लोकसभेची निवडणूक फक्त निवडणूक नसून संविधान वाचवण्याची लढाई आहे.आणि लोकशाही वाचवण्यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे असे आवाहान त्यांनी केले.जाती धर्मात फूट घालून सत्तेत यायचे आणि बहुमताच्या जीवावर दडपशाही करत विरोधी पक्षाच्या नेत्याना निलंबित करायचे हे धोरण मोदी सरकारचे असून राजकीय सूडातून माझ्यावर चुकीच्या पद्धतीने दोन वेळा निलंबन कार्यवाही केली गेली परंतु या देशाच्या लोकशाही आणि संविधानमुळे मोदींना माझी खासदारकी पुन्हा बहाल करावी लागली. अमोल कोल्हे हे देखील दबावापुढे झुकले नाहीत ते एकनिष्ठ राहिले असून युवकांची आवाज म्हणून त्यांना पुन्हा एकदा दिल्लीला पाठवा असेही म्हणाले.”

यावेळी बोलताना युवक अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले”दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने वेदांत फॉक्सकॉन सारखे मोठे प्रकल्प गुजरात ला हलवले असून यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील लाखो तरुण बेरोजगार झाले असून महाराष्ट्रातील युवकांचे रोजगार गुजरातला पळवणाऱ्या भाजपचा बदला येथील बेरोजगार युवक या निवडणुकीत नक्कीच घेतील असे ते म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख,मुंबई प्रदेश चे सोहेल भाई सुभेदार,महिला अध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर,युवक कार्यअध्यक्ष सागर तापकीर,मौलाना अब्दुल गफ्फार,मौलाना अकबर,इम्तियाज शेख,रजनीकांत गायकवाड, मेघराज लोखंडे,रेखा मोरे,कल्पना घाडगे,ताहेरा सय्यद,नियमात शेख अब्दुल्ला शेख आलम खान बंदेअली सय्यद,रेहमान सय्यद,समाधान अचलखाब,राजेश हरगुडे,समीर मुल्ला,
हाजीमलंग शेख,सुफ्रान शेख,फहिम शेख,
इस्लाम चाचा,दानिश अंसारी आणि इतर प्रमुख युवक पदाधिकारी उपस्तिथ होते.

 

Contents
राष्ट्रवादी लक्षद्वीपचे खासदार मोहंमद फैजल यांचा भोसरी विधानसभेतील युवकांशी संवाद.महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ भोसरी,निगडी,इंद्रायणी नगर परिसरात घेतल्या भेटीगाठी.शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संसदरत्न खासदार डॉ अमोलदादा कोल्हे यांच्या प्रचार्राथ लक्षद्वीप चे खासदार मोहंमद फैजल यांनी इंद्रायणी नगर येथे अल्पसंख्याक समाजाच्या प्रमुख व्यक्तींशी संवाद साधला. तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्याशी निगडी ओटास्किम परिसरात संवाद साधला. यावेळी खासदार मोहंमद फैजल यांनी देशातील एकूण परिस्तिथी वर युवकांना मार्गदर्शन केले.या वेळी बोलताना ते. म्हणाले “या लोकसभेची निवडणूक फक्त निवडणूक नसून संविधान वाचवण्याची लढाई आहे.आणि लोकशाही वाचवण्यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे असे आवाहान त्यांनी केले.जाती धर्मात फूट घालून सत्तेत यायचे आणि बहुमताच्या जीवावर दडपशाही करत विरोधी पक्षाच्या नेत्याना निलंबित करायचे हे धोरण मोदी सरकारचे असून राजकीय सूडातून माझ्यावर चुकीच्या पद्धतीने दोन वेळा निलंबन कार्यवाही केली गेली परंतु या देशाच्या लोकशाही आणि संविधानमुळे मोदींना माझी खासदारकी पुन्हा बहाल करावी लागली. अमोल कोल्हे हे देखील दबावापुढे झुकले नाहीत ते एकनिष्ठ राहिले असून युवकांची आवाज म्हणून त्यांना पुन्हा एकदा दिल्लीला पाठवा असेही म्हणाले.”यावेळी बोलताना युवक अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले”दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपने वेदांत फॉक्सकॉन सारखे मोठे प्रकल्प गुजरात ला हलवले असून यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील लाखो तरुण बेरोजगार झाले असून महाराष्ट्रातील युवकांचे रोजगार गुजरातला पळवणाऱ्या भाजपचा बदला येथील बेरोजगार युवक या निवडणुकीत नक्कीच घेतील असे ते म्हणाले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक अध्यक्ष इम्रानभाई शेख,मुंबई प्रदेश चे सोहेल भाई सुभेदार,महिला अध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर,युवक कार्यअध्यक्ष सागर तापकीर,मौलाना अब्दुल गफ्फार,मौलाना अकबर,इम्तियाज शेख,रजनीकांत गायकवाड, मेघराज लोखंडे,रेखा मोरे,कल्पना घाडगे,ताहेरा सय्यद,नियमात शेख अब्दुल्ला शेख आलम खान बंदेअली सय्यद,रेहमान सय्यद,समाधान अचलखाब,राजेश हरगुडे,समीर मुल्ला, हाजीमलंग शेख,सुफ्रान शेख,फहिम शेख, इस्लाम चाचा,दानिश अंसारी आणि इतर प्रमुख युवक पदाधिकारी उपस्तिथ होते.
TAGGED:
Share This Article
Leave a comment