राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार बूथ प्रमुखांचा मेळाव्यास जोरदार प्रतिसाद.

Strong response of NCP Youth Congress Sharad Chandra Pawar booth chief to the meeting.

PCC NEWS

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार बूथ प्रमुखांचा मेळाव्यास जोरदार प्रतिसाद.

युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांचे शक्तिप्रदर्शन.

पिंपरी चिंचवड दि. 01 राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)आयोजित बूथ प्रमुख संवाद मेळावा युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वात भोसरी येथील क्वालिटी सर्कल हॉल येथे पार पडला.पक्ष फुटी नंतर मोठ्या संख्येने नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी शरदचंद्र पवार यांना सोडून गेल्यानंतर देखील. प्रतिकूल परिस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील युवक पदाधिकारी,महिला आणि विद्यार्थी पदाधिकाऱ्यांनी पक्षातील एकनिष्ठ लोकांच्या सोबतीने भोसरी विधानसभेतील 464 बूथ कमिटीची संपूर्ण बांधणी करून पक्ष संघटना आजही दमदार असल्याचा संदेश शहरातील इतर पक्षातील लोकांना दिला. यावेळी भोसरी विधानसभेतील बूथ अध्यक्ष यांना प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी बोलताना युवक शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले “ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असून जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना ईडी, सीबीआयच्या बंदुकीच्या धाकावर भाजपात घेणाच्या राक्षसी प्रवृत्ती विरुद्ध सामान्य नागरिक पेटून उठलेला आहे.

महागाई, स्त्रियांवरील अत्याचार,जातीयवाद, बेरोजगारी या प्रमुख मुद्द्यासहित पुणे जिल्ह्यातील युवकांचे रोजगार गुजरातला पळवणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात महिला तसेच युवकांमध्ये तीव्र नाराजी असून सर्वसामान्य नागरिक, बेरोजगार युवा या जुलमी सरकारला मातीत गाडायला स्वतःहून पुढे सरसावली आहेत.त्यामुळे शिरूर लोकसभेची ही निवडणूक लोकांनी स्वतःच्या अंगावर घेतली आहे.लोक आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या बाजूला उभे राहतील याचा ठाम विश्वास आम्हाला आहे.यावेळी भोसरी विधानसभेतील मायबाप जनता खासदार अमोल कोल्हे यांना सर्वाधिक मताधिक्य देणार आहे असेही ते म्हणाले.

निरीक्षक प्रकाश म्हस्के म्हणाले “नेते पदाधिकारी जरी भाजपाच्या गळाला लागले असतील तरी सर्वसामान्य कार्यकर्ता आणि मतदार हा फक्त आदरणीय शरद पवार साहेब यांच्या सोबतच आहे.युवक अध्यक्ष इम्रान शेख,महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर आणि सहकाऱ्यांनी भोसरी सारख्या अवघड विधानसभेत इतक्या शिस्तबद्ध पद्धतीने मोठ्या संख्येने बूथ अध्यक्षांचा मेळावा आयोजित केला.यांचे कौतुक केले.शिरूर लोकसभेतील सहा विधानसभापैकी भोसरी विधानसभेतून सर्वाधिक मताधिक्य अमोल कोल्हे यांना मिळेल यात शंका नाही असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे म्हणाले “९ वर्षाच्या असफल सत्तेच्या उपभोगानंतर राज्यात केलेल्या प्रत्येक सर्वेत भाजप पिछाडीवर असल्याचे रिपोर्ट होते. म्हणून लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षांचे खच्चीकरण करण्यासाठी 50 खोक्यांच्या, इडी आणि सीबीआयच्या जीवावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून त्यांची ताकद कमी करण्याचा रडीचा डाव भाजपाने महाराष्ट्रात खेळला परंतु त्यांचे फासे त्यांच्यावरच उलटे झाले असून महाराष्ट्रातील तमाम मायबाप जनता या गद्दारीला सहन करणार नाही. या लोकसभेत सर्वात जास्त संख्येने महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वैद्यकीय सेल प्रदेशाध्यक्ष गौतम आगा म्हणाले”जातीच्या धर्माच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडणाऱ्या, संविधानाची पायमल्ली करणाऱ्या, लोकशाहीची हत्या करणाऱ्या शक्तींना सत्तेतून पायउतार करण्याची गरज असून जनता महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करेल.

या मेळाव्यास विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे राज्य उपाध्यक्ष प्रकाश म्हस्के, युवक निरीक्षक तसेच वैद्यकीय सेल प्रदेशाध्यक्ष गौतम आगा, महिला शहराध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर, पुणे जिल्हा ग्रामीण युवक अध्यक्ष स्वप्निल भैय्या गायकवाड,सागर दादा कोल्हे, युवक शहर कार्याध्यक्ष सागर तापकीर, वरिष्ठ नेते शिरीष जाधव,विद्यार्थीअध्यक्ष राहुल आहेर, विशाल मुरलीधर जाधव,युवक विधानसभा अध्यक्ष संतोष शिंदे,युवक महिला अध्यक्ष सारिका हरगुडे,युवक पदाधिकारी रजनीकांत गायकवाड, मेघराज लोखंडे,ॲड अमोल गव्हाणे, असिफ शेख,अजय मालवदे,शकील शेख,रेखाताई मोरे,जयमाला कदम,ताहेरा सय्यद,हाजीमलंग शेख, बबिता बनसोडे व मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी महिला पदाधिकारी आदरणीय पवार साहेबांना मानणारे नागरिक उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.

TAGGED:
Share This Article
Leave a comment