महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांची भोसरी युवक पदाधिकारी यांच्याशी “ चाय पे चर्चा ”
पिंपरी चिंचवड दिनांक: १० मार्च २०२४ राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांनी आज पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा युवक पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या निवासस्थानी युवक पदाधिकारी यांच्याशी “चाय पे चर्चा” केली.यावेळी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे उपस्थित होते.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रमुख असलेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघातील युवक पदाधिकाऱ्यांशी प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी संवाद साधला.यावेळी अल्पसंख्याक समाजातील महत्त्वाच्या व्यक्तींशी देखील संवाद साधला.भोसरी विधानसभेतील ४६४ बूथ कमिटीची जबाबदारी युवक संघटनेने पार पाडावी असे आदेश युवक पदाधिकाऱ्यांना दिले.तसेच येणाऱ्या पंधरा दिवसात बुथ कमिटी अध्यक्षांचा मेळावा तसेच भोसरी विधानसभा युवक कार्यकारणीचे पदनियुक्ती कार्यक्रम घेण्याचे आदेश दिले.विद्यमान संसदरत्न खासदार डॉ.अमोल दादा कोल्हे यांच्या प्रचारार्थ भोसरी विधानसभेतील भोसरी,इंद्रायणी नगर,रुपिनगर,ओटा स्कीम,दिघी,मोशी या भागातील महत्त्वपूर्ण जबाबदार व्यक्तींच्या घरी भेट दिली,तसेच अल्पसंख्याक समाजातील मौलाना यांच्या भेटीगाठी घेतल्या,समविचारी मित्र पक्षातील प्रमुख पदाधिकारी,तसेच एमआयडीसी भागातील उद्योजक यांच्या भेटीगाठी घेतल्या.भोसरी MIDC येथील एक्सेलंट टूल्स टेक, डिसाईन टेक,साई स्टोन,एक्सेलंट टेकनोलॉजी या ऑटोमोबाइल क्षेत्राशी निगडित कंपन्यांना भेट दिली यावेळी युवकांनी त्यांच्या या अचानक ठरलेल्या दौऱ्यास भरभरून प्रतिसाद दिला.
यावेळी बोलताना युवक शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले “प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांनी काल रात्री अचानक फोन करून शहरात येणार असल्याचे कळवले.तसेच भोसरी विधानसभेतील पदाधिकाऱ्यांना चहा पानासाठी बोलवून घ्या असे सांगितले. यावेळी प्रदेशअध्यक्ष यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला.येत्या आठवड्यात युवक पदाधिकारी यांनी बूथ कमिटी मेळावा घेण्याचे निर्देश दिले.व युवक पदाधिकारी यांच्याशी वन टू वन संवाद साधला.त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यावर वरिष्ठांशी चर्चा करुन मार्ग काढू असे सांगितले. लवकरच युवक शहर कार्यकारणी जाहीर केली जाणार असून पिपंरी विधानसभा,तसेच चिंचवड विधानसभा युवक अध्यक्षपदी नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असून भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रत्येक वॉर्डातील तरुणांना युवक संघटनेत नियुक्ती देणार असल्याची माहिती इम्रान शेख यांनी दिली.
यावेळी युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, कार्याध्यक्ष सागर तापकीर, भोसरी विधानसभा अध्यक्ष संतोष शिंदे, मौलाना अब्दुल गफार, मौलाना अकबर, काँग्रेसचे अल्पसंख्याक अध्यक्ष शाहबुद्दीनभाई,शेख महबूब,अनिस देशमुख,अश्रफ शेख,ऋषिकेश गारडे,प्रशांत काळेल,अश्रफ शेख,रजनीकांत गायकवाड,सचिन भाऊ निंबाळकर,बाबाजी जाधव,मयूर खरात,अमोल माळी,हाजी मलंग शेख,समीर भाई मुल्ला.व्यंकटेश मोहने,सुरज सरोदे,पियुश अंकुश,शाहिद शेख,साहिल वाघमारे,अनिकेत बिरंगळ आणि मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांची भोसरी युवक पदाधिकारी यांच्याशी “ चाय पे चर्चा ”
पिंपरी चिंचवड दिनांक: १० मार्च २०२४ राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांनी आज पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा युवक पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या निवासस्थानी युवक पदाधिकारी यांच्याशी “चाय पे चर्चा” केली.यावेळी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे उपस्थित होते.आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर लोकसभा मतदारसंघात प्रमुख असलेल्या भोसरी विधानसभा मतदारसंघातील युवक पदाधिकाऱ्यांशी प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी संवाद साधला.यावेळी अल्पसंख्याक समाजातील महत्त्वाच्या व्यक्तींशी देखील संवाद साधला.भोसरी विधानसभेतील ४६४ बूथ कमिटीची जबाबदारी युवक संघटनेने पार पाडावी असे आदेश युवक पदाधिकाऱ्यांना दिले.तसेच येणाऱ्या पंधरा दिवसात बुथ कमिटी अध्यक्षांचा मेळावा तसेच भोसरी विधानसभा युवक कार्यकारणीचे पदनियुक्ती कार्यक्रम घेण्याचे आदेश दिले.विद्यमान संसदरत्न खासदार डॉ.अमोल दादा कोल्हे यांच्या प्रचारार्थ भोसरी विधानसभेतील भोसरी,इंद्रायणी नगर,रुपिनगर,ओटा स्कीम,दिघी,मोशी या भागातील महत्त्वपूर्ण जबाबदार व्यक्तींच्या घरी भेट दिली,तसेच अल्पसंख्याक समाजातील मौलाना यांच्या भेटीगाठी घेतल्या,समविचारी मित्र पक्षातील प्रमुख पदाधिकारी,तसेच एमआयडीसी भागातील उद्योजक यांच्या भेटीगाठी घेतल्या.भोसरी MIDC येथील एक्सेलंट टूल्स टेक, डिसाईन टेक,साई स्टोन,एक्सेलंट टेकनोलॉजी या ऑटोमोबाइल क्षेत्राशी निगडित कंपन्यांना भेट दिली यावेळी युवकांनी त्यांच्या या अचानक ठरलेल्या दौऱ्यास भरभरून प्रतिसाद दिला.यावेळी बोलताना युवक शहराध्यक्ष इम्रान शेख म्हणाले “प्रदेशाध्यक्ष मेहबूब भाई शेख यांनी काल रात्री अचानक फोन करून शहरात येणार असल्याचे कळवले.तसेच भोसरी विधानसभेतील पदाधिकाऱ्यांना चहा पानासाठी बोलवून घ्या असे सांगितले. यावेळी प्रदेशअध्यक्ष यांनी भोसरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला.येत्या आठवड्यात युवक पदाधिकारी यांनी बूथ कमिटी मेळावा घेण्याचे निर्देश दिले.व युवक पदाधिकारी यांच्याशी वन टू वन संवाद साधला.त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यावर वरिष्ठांशी चर्चा करुन मार्ग काढू असे सांगितले. लवकरच युवक शहर कार्यकारणी जाहीर केली जाणार असून पिपंरी विधानसभा,तसेच चिंचवड विधानसभा युवक अध्यक्षपदी नवीन कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार असून भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रत्येक वॉर्डातील तरुणांना युवक संघटनेत नियुक्ती देणार असल्याची माहिती इम्रान शेख यांनी दिली.यावेळी युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, कार्याध्यक्ष सागर तापकीर, भोसरी विधानसभा अध्यक्ष संतोष शिंदे, मौलाना अब्दुल गफार, मौलाना अकबर, काँग्रेसचे अल्पसंख्याक अध्यक्ष शाहबुद्दीनभाई,शेख महबूब,अनिस देशमुख,अश्रफ शेख,ऋषिकेश गारडे,प्रशांत काळेल,अश्रफ शेख,रजनीकांत गायकवाड,सचिन भाऊ निंबाळकर,बाबाजी जाधव,मयूर खरात,अमोल माळी,हाजी मलंग शेख,समीर भाई मुल्ला.व्यंकटेश मोहने,सुरज सरोदे,पियुश अंकुश,शाहिद शेख,साहिल वाघमारे,अनिकेत बिरंगळ आणि मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी उपस्थित होते.