मोशी येथील स्वप्नपूर्ती हौसिंग सोसायटी चा पाणी प्रश्न पेटणार !
Share
2 Min Read
SHARE
मोशी येथील स्वप्नपूर्ती हौसिंग सोसायटी चा पाणी प्रश्न पेटणार !
पिंपरी चिंचवड दिनांक: 24.01.2024 स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील स्वप्नपूर्ती हौसिंग सोसायटी मध्ये तीव्र पाणी टंचाई सुरू असल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.ही पाणी टंचाई दूर करून स्वप्नपूर्ती हौसिंग सोसायटी चा पाणी प्रश्न आयुक्तांनी दूर करावा,अन्यथा महानगर पालिकेवर हंडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा मा.नगरसेविका सारीकाताई बोऱ्हाडे यांनी आयुक्तांना दिला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मोशी येथील बोराडेवाडी भागातील महा नगर पालिकेच्या या प्रकल्पात 14 मजली 6 A B C D E F अशा इमारती असून, एकूण 1288 सदनिका आहेत.1288 घर असून 4 ते 5 हजार लोक वस्ती येथे आहे,राहायला आल्यापासून रोज कुठल्यातरी नवीन समस्येला सामोरे जावे लागत आहे. समस्येशी निगडित लोकांना वारंवार सांगून ही कुठल्याही समस्येचे निवारण होत नाही.त्याचप्रमाणे पाणी टंचाईचा प्रश्न ही वाढत चालला आहे.3-4 महिन्यापासून पाणी टंचाई ची समस्या खूप भीषण झाली आहे.
आपण एका व्यक्तीला 130 लिटर पाणी रोज वापरण्यासाठी पकडल तरी घरात 4 लोक समजून एका घराला 520 लिटर पाणी लागते.520 लिटर गुणिले 216 फ्लॅट आहेत, म्हणजेच आपल्याला एका बिल्डिंग ला पाणी पाहिजे 112320 लिटर एवढे आणि त्यात एक दिवसा आड पाणी येते मणजे ते झाले 224640 लिटर पाणी पाहिजे.पण पाणी येते किती तर 25000 लिटर ,40000 लिटर, 70000 हजार लिटर,मग कस काय पुरणार पाणी त्यामुळे येथील रहिवाशांना पिण्यासाठी, वापरण्यासाठी चक्क टॅंकरने पाणी मागावे लागत आहे.पाणी प्रश्न एवढा गंभीर होत चालला आहे की चक्क नागरिकांना काम धंदा सोडून, बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या सर्व लोकां कडून पैसे जमा करून,टँकर चे पाणी भरावे लागते.
त्यामुळे स्वतः आयुक्त साहेबांनी या प्रकरणात लक्ष घालणं आवश्यक असून, त्यावर कायम स्वरुपी तोडगा काढण्याची विनंती येथील नागरिकांनी माजी नगरसेविका सारीकाताई बोऱ्हाडे यांच्याकडे केली असता , त्यांनी या सर्व परिसराचा आढावा घेऊन,संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून नवीन पाइप लाईन ची मागणी करून, लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावावा,अन्यथा मा.आमदार महेश दादा लांडगे यांच्या मार्गर्शनाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर हंडा मोर्चा काढू असा इशारा त्यांनी आयुक्तांना दिला आहे.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते नितीन बोऱ्हाडे ही उपस्थित होते.