शंभराव्या नाट्य संमेलनासाठी पिंपरी-चिंचवड मधील नाट्यगृहे सजली.

PCC NEWS

शंभराव्या नाट्य संमेलनासाठी पिंपरी – चिंचवड मधील नाट्यगृहे सजली.

पिंपरी : शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी क्रीडा संकुलावर ६ व ७ जानेवारी २०२४  दरम्यान या नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य सभामंडपाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. तर भोईर नगर येथील बालनाट्य नगरी देखील नाट्य संमेलनासाठी सज्ज झाली आहे. याशिवाय नाट्य संमेलनाचे कार्यक्रम व नाटकं ज्या पाच नाट्यगृहात होणार आहेत; ती नाट्यगृह देखील रंगबिरंगी लाईट्स ने सजली आहेत. त्यामुळे उद्योग नगरी असलेल्या पिंपरी – चिंचवडमध्ये १०० व्या नाट्य संमेलनाचे पडघम वाजू लागल्याचे चित्र आहे.असे नाट्य संमेलनाचे आयोजक,नाटय परिषद पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर म्हणाले.

मुख्य सभा मंडपा शिवाय पिंपळे गुरव येथील निळू फुले नाट्यगृह, भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह,चिंचवड येथील प्रा रामकृष्ण मोरे नाट्यगृह तसेच निगडी येथील ग. दि. माडगूळकर सभागृह १ व २ या पाच ठिकाणी उदघाटन सोहळ्या दरम्यान तब्बल ६४ वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम व नाटकांची मेजवानी रसिक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. ही सर्व नाट्यगृह आता रंगबिरंगी लाईट्स ने सजली असून नाट्यगृहांचा परिसर व उद्योग नगरीचे रास्ते देखील सांस्कृतिक वातावरणात उजळून निघाले आहेत.

TAGGED:
Share This Article
Leave a comment