वाळुंज औद्योगिक वसाहतीत हॅंडग्लोज बनविणाऱ्या सनशाईन‌ एंटरप्राईज कंपनीला आग ६ कामगारांचा मृत्यू.

PCC NEWS

वाळुंज औद्योगिक वसाहतीत हॅंडग्लोज बनविणाऱ्या सनशाईन‌ एंटरप्राईज कंपनीला आग ६ कामगारांचा मृत्यू.

पुणे दिनांक ३१ डिसेंबर छत्रपती संभाजीनगर मध्ये हॅंडग्लोज बनविणाऱ्या कंपनीला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

दरम्यान कामगार झोपेत असताना ही आग लागली आहे.

वाळुंज औद्योगिक वसाहतीत हॅंडग्लोज बनविणाऱ्या सनशाईन‌ एंटरप्राईज कंपनीला आग लागली.

या आगीत एकूण ६ कामगांरांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

तर आग लागल्यानंतर या कंपनीमध्ये काम करणाऱ्या ४ जणांनी या आगीतून आपली सुटका केली आहे.

दरम्यान या घटने प्ररकणी सुत्रांन कडून मिळालेल्या माहिती नुसार वाळूज औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या सनशाईन एंटरप्राईज सी २१६ या हॅंडग्लोज बनविणाऱ्या कंपनीत एकूण २० ते ३५ कामगार हे काम करतात.तर यातील १० कामगार हे कंपनी मध्ये राहतात.

दरम्यान हे सगळे कामगार झोपले असताना या कंपनीला अचानकपणे आग लागली.

यातील झोपलेल्या चार कामगार यांना गरम वाफ लागली व ते जागे झाले.

तेव्हा त्यांना आग लागल्याची दिसली त्यानंतर त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी पळापळ केली.

दरम्यान कंपनी मधून बाहेर पडायचे तिथेच आग लागल्याने आता मध्ये असलेल्या कामगारांना बाहेर पडता येत नव्हते काही कामगार यांनी पत्र्यावरुन एका झाडाच्या सहाय्याने सुखरुप बाहेर पडण्यात त्यांना यश आले व यात त्यांचा जीव वाचला आहे.

तर अन्य ६ कामगार यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.

दरम्यान या आगीची माहिती रात्री दोन वाजण्याच्या सुमारास संभाजीनगर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना दिल्या नंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली व यातील ६ मृत्यू झालेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे काम केले.

आता आगीवर नियंत्रण आणण्यात आले आहे.व सध्या कंपनी मध्ये कुंलीगचे काम सुरू आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a comment