हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलच्या हीरक महोत्सवाचे शुक्रवारी उद्धाटन.

PCC NEWS

हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलच्या हीरक महोत्सवाचे शुक्रवारी उद्धाटन

युनूस खतीब पिंपरी चिंचवड 9420554065

पिंपरी, पुणे (दि.२० डिसेंबर २०२३) पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूलची स्थापना २० जुलै १९५८ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाली होती. शाळा यावर्षी हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे.

त्या निमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन शुक्रवारी (दि.२२) शाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आले आहे.

यामध्ये सकाळी ७:३० वाजता कला, विज्ञान, शैक्षणिक प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योजक जयदेव अक्कलकोटे आणि सकाळी १० वाजता, पारितोषिक वितरण समारंभ पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती शाळा समिती अध्यक्ष खेमराज रणपिसे आणि हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शशांक परमाणे, मुख्याध्यापक सुनील शिवले यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

तसेच इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवारी (दि.२१) सकाळी नऊ वाजता कामगार नेते व माजी विद्यार्थी डॉ. कैलास कदम यांच्या हस्ते होणार आहे. इयत्ता आठवी ते दहावी च्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवारी (दि.२३) सकाळी दहा वाजता उद्योजक व माजी विद्यार्थी श्रीकांत बडवे यांच्या हस्ते होणार आहे.

महोत्सवाची सांगता रविवारी (दि.२४) आनंद मेळावा आणि हिंदुस्थान अँटिबायोटिक्स स्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या ‘ही आवडते मज मनापासून शाळा’ हे नाटक आणि ऑर्केस्ट्राने होणार आहे.

१९६९ ते २०२२ पर्यंतच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी माजी विद्यार्थी संघटनेची स्थापना केली आहे. संघटनेने या वर्षी शाळेच्या इमारतीची डागडुजी, वर्गखोल्या रंगकाम, स्वच्छ्ता व पर्यावरण जागृतीसाठी पवना धरण परिसर व तिकोना किल्ला मावळ येथे प्लास्टिक मुक्त स्वच्छता अभियान, वृक्षारोपण केले आहे. तसेच शाळेला यावर्षी स्मार्ट बोर्ड दिले आहेत. आता न्यू एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत शाळा ई स्कूल करण्याचा संकल्प आहे.

यासाठी माजी विद्यार्थ्यांनी यथाशक्ती योगदान द्यावे असे आवाहन उपाध्यक्ष गणेश गांवकर, सचिव आशिष म्हसे, समन्वयक मोहन बाबर, अशोक थोरात यांनी केले आहे. हीरक महोत्सव कार्यक्रमांच्या आयोजनात उपमुख्याध्यापिका दीपा अभ्यंकर, विद्यार्थी प्रतिनिधी निखिल साबळे, आर्या मोटे, कार्याध्यक्ष रमेश गाढवे, उप कार्याध्यक्ष श्वेता नाईक, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष समाधान गेजगे आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे.

TAGGED:
Share This Article
Leave a comment